सागरी कासवांचे संवर्धन काळाची गरज
By Admin | Updated: October 6, 2016 03:40 IST2016-10-06T03:40:57+5:302016-10-06T03:40:57+5:30
सागरी कासवांचे संवर्धन होणे ही काळाची गरज असून यासाठी जनजागृतीसुद्धा करणे आवश्यक आहे.

सागरी कासवांचे संवर्धन काळाची गरज
नांदगाव/ मुरु ड : सागरी कासवांचे संवर्धन होणे ही काळाची गरज असून यासाठी जनजागृतीसुद्धा करणे आवश्यक आहे. काही लोक कासवांची तस्करी करतात. कासवांची शिकार करणे हा कायद्याने गुन्हा असून त्याला किमान सात वर्षे शिक्षा होऊ शकते. वाघांप्रमाणे कासवांचे कायद्याने संरक्षण केले असून कासव बचाव मोहीम जोरदार सुरू झाली आहे. स्थानिक नागरिकांनी या मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन प्राणी व पक्षिमित्र सागर मेस्त्री यांनी केले. फणसाड अभयारण्याच्या वतीने १ ते ७ आॅक्टोबर रोजी वन्यजीव सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी उपस्थित मान्यवरांना मार्गदर्शन करताना आपले विचार व्यक्त के ले.
सागर मेस्त्री म्हणाले की, केळशी व दिवेआगर समुद्रकिनारी असंख्य कासव अंडी देण्यासाठी येतात ती अंडी संरक्षित करण्यासाठी बाजूला तारेचे
कुं पण टाकले आहे. १३ वर्षांत सात हजार कासव पिल्लांना जीवनदान दिल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. गिधाड जात नष्ट होत असल्याबद्दल मेस्त्री यांनी खेद व्यक्त करून फणसाड अभयारण्यात वेगवेगळे प्रयत्न करून ही जात वृद्धिंगत करण्याचा जो प्रयत्न केला त्याबद्दल विशेष प्रशंसा केली.
यावेळी उपवन संरक्षक ठाणे दादासाहेब शेडगे, विभागीय वनाधिकारी सुरेश दराडे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)