शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

उरण नगरपरिषदेच्या आमसभेत अधिकारी-नागरिकांत खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 03:27 IST

जेएनपीटी सिडको प्रकल्पग्रस्तांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेला साडेबारा टक्के भूखंड वितरणाचा प्रश्न, तालुक्यातील अनेक गावांना जाणविणारी भीषण पाणीटंचाई,

उरण : जेएनपीटी सिडको प्रकल्पग्रस्तांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेला साडेबारा टक्के भूखंड वितरणाचा प्रश्न, तालुक्यातील अनेक गावांना जाणविणारी भीषण पाणीटंचाई, विजेचा सुरू असलेला लपंडाव, उरणकरांसाठी डोकेदुखी ठरू पाहणारी वाहतूककोंडीची समस्या, वाढती बेरोजगारी, जेएनपीटीच्या चौथ्या बंदरातील वादग्रस्त नोकरभरती, रस्ते दुरुस्ती बांधणीत अपयशी वादग्रस्त ठरलेले ठेकेदारांनाच पुन्हा देण्यात येत असलेली कामे, अनधिकृत कंटेनर यार्ड, सातत्याने गैरहजर राहणारे शासकीय अधिकारी आदी अनेक प्रश्नांवर सोमवारी झालेल्या आमसभेत जोरदार चर्चा झाली.

उरण तालुक्यात १९८० पासूनच औद्योगिकीकरणाला सुरुवात झाली ती आजतागायत सुरूच आहे. ओएनजीसी, जेएनपीटी, बीपीसीएल, उरण वायू विद्युत केंद्र, सिडको, नौदल शस्त्रागार आदी विविध शासकीय प्रकल्पावर आधारित शेकडो कंपन्या उभारण्यात आल्या आहेत. सिडकोने जेएनपीटी बंदर उभारण्यासाठी व नवी मुंबईच्या निर्मितीसाठी येथील हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी संघर्षानंतरही जबरदस्तीने कवडीमोल भावाने संपादन केल्या. शेतकºयांच्या कडव्या संघर्षानंतर प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकºया, विविध प्रकल्पांमध्ये रोजगार, साडेबारा टक्के विकसित भूखंड देण्याची आश्वासने शासनाच्या वतीने देण्यात आली. मात्र शासनाला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणे अद्याप तरी शक्य झाले नाही.जेएनपीटी कामगार वसाहतीमधील बहुउद्देशीय सभागृहात आ. मनोहर भोईर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित आमसभेप्रसंगी उरण पंचायतीचे सभापती नरेश घरत, उपसभापती वैशाली पाटील, राजिप सदस्य विजय भोईर, बाजीराव परदेशी, सदस्या कुंदा ठाकूर, उपसमिती सदस्य दीपक ठाकूर, हिराजी घरत आदी इतर मान्यवरांसह उरण तहसीलदार कल्पना गोडे, गटविकास अधिकारी नीलम गाडे, आदी उपस्थित होते. विजेचा प्रश्न उपस्थित होताच भेडसाविणाºया विजेच्या अनेक प्रश्नांवर नागरिकांनी वीज अधिकाºयांना घेरले. ग्रामीण भागातील गंजलेले विजेचे पोल बदलण्याची मागणी उरणकरांची आहे. शैक्षणिक समस्या, दररोज डोईजड होत चाललेली वाहतुकीची कोंडी, खड्डेमय रस्ते, वाढते अपघात, अनधिकृत कंटेनर यार्ड, तहसील, पोलीस विभागातील बोकाळलेला भ्रष्टाचार, बेरोजगारी, पाणजे गाव आणि रानसई आदिवासी वाडीचाच नव्हे संपूर्ण तालुक्यातील विजेचा प्रश्न, प्रकल्पग्रस्तांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर माजी जि. प. सदस्य वैजनाथ ठाकूर, कृष्णा पाटील, संतोष ठाकूर, संजय ठाकूर, सुरेश पाटील आदी ग्रामस्थांनी आवाज उठवला.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईcidcoसिडको