सत्ताधारी विरोधक आमनेसामने; परिवहन समिती सदस्य निवडीवरून महासभेत संघर्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 16:06 IST2026-02-23T16:05:49+5:302026-02-23T16:06:33+5:30
महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती सदस्य निवडीवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये संघर्ष झाला.

सत्ताधारी विरोधक आमनेसामने; परिवहन समिती सदस्य निवडीवरून महासभेत संघर्ष
नवी मुंबई: महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती सदस्य निवडीवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये संघर्ष झाला. तौलनिक संख्याबळाच्या बळावर सदस्य न निवडल्यामुळे शिंदेसेनेने तीव्र निषेध केला. यामुळे सभागृह तहकूब करण्यात आले.
नवी मुंबई महानगर पालिका परिवहन समितीवर १२ सदस्य निवडीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. सभागृहनेते सागर नाईक यांनी तौलनिक संख्याबळाऐवजी मतदानाद्वारे सदस्य निवडीचा मुद्दा मांडला. विरोधीपक्षनेते विजय चौगुले, शिवराम पाटील, किशोर पाटकर यांनी या प्रक्रियेला आक्षेप घेतले. यानंतर ही सत्ताधारी भाजपने परिवहन सदस्यपदासाठी नावं सुचविण्यास सुरूवात केल्याने शिंदेसेनेने महापौरांचा निषेध केला.
शिंदेसेनेने महापौरांसमोर उभं राहून निषेध केला. यानंतर भाजपा नगरसेवकांनी महापौरांसमोर केला. गोंधळामुळे सभा तहकूब करण्यात आली. सभा पुन्हा सुरू झाल्यानंतर भाजपाने बहुमताच्या बळावर १२ सदस्यांची निवड केली. विरोधकांचा एकही सदस्य न घेतल्यामुळे शिंदेसेनेच्या नगरसेवकांनी सभात्याग केला.