शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षांपासून अधिकारी नसल्याने जनावरांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 00:32 IST

तळा पशुवैद्यकीय चिकित्सालयात सुविधांची वानवा

ठळक मुद्देतळा पशुवैद्यकीय चिकित्सालयाची अवस्थादेखील बिकट झाली असून, स्वतःची हक्काची जागा नाही. तसेच पशुवैद्यकीय चिकित्सालयाची कित्येक वर्षांपासून दुरुस्तीदेखील केलेली नाही. 

तळा : तळा तालुक्यातील पशुवैद्यकीय चिकित्सालयात गेल्या चार वर्षांपासून पशुवैद्यकीय अधिकारीच नसल्याने जनावरांचे हाल होत असल्याचे चित्र आहे. शेतीला प्रमुख पूरक व्यवसाय म्हणून ओळखला जाणारा व अनेकांना रोजगार उपलब्ध करून देणारा पशुपालन व्यवसाय असला तरी सध्या त्याची स्थिती बिकट आहे. तळा पशुवैद्यकीय चिकित्सालयाच्या हद्दीत ४२ गावे येत असून तालुक्यात मोठ्या संख्येने पशुधन असताना त्यांच्यावर उपचाराची मात्र प्रभावी यंत्रणा नाही. शेतीला जोडधंदा म्हणून बहुतांश शेतकऱ्यांकडे दुधाळ जनावरे व शेती हिताच्या दृष्टीकोनातून इतर पशुधन आहे. मात्र तळा पशुवैद्यकीय चिकित्सालयात गेल्या चार वर्षांपासून महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. ज्यामध्ये पशुधन विकास अधिकारी व व्रणोपचार यांचा समावेश आहे. यामुळे याचा थेट परिणाम जनावरांच्या उपचारावर होत आहे. 

तळा पशुवैद्यकीय चिकित्सालयाची अवस्थादेखील बिकट झाली असून, स्वतःची हक्काची जागा नाही. तसेच पशुवैद्यकीय चिकित्सालयाची कित्येक वर्षांपासून दुरुस्तीदेखील केलेली नाही. ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय केंद्रांमध्ये पशुधन पर्यवेक्षकांकडून जनावरांवर उपचार केले जातात; परंतु शस्त्रक्रियांसारख्या बाबींसाठी शेतकरी आपली जनावरे तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या पशुवैद्यकीय चिकित्सालयात आणतात. या चिकित्सालयाशिवाय शेतकऱ्यांकडे दुसरा पर्याय नसतो. परंतु, या ठिकाणी असलेली विविध रिक्त पदे, औषधांचा तुटवडा अशा अनेक बाबींमुळे या ठिकाणी अपेक्षित असे उपचार पशूंना मिळत नाहीत. येथील शेतकऱ्यांना आपल्या जनावरांवर उपचार करण्यासाठी इतर तालुक्यांतील डॉक्टरांना बोलवावे लागत आहे. यामुळे जनावरांचे हाल होत आहेत. त्यामुळे तळा पशुवैद्यकीय चिकित्सालयातील रिक्त पदे लवकर भरण्यात यावीत, अशी मागणी होत आहे.

जनावरांवर उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने आम्हा शेतकऱ्यांना तालुक्याबाहेरील डॉक्टरांना बोलावून जनावरांवर उपचार करावे लागतात. यामुळे वेळ आणि पैसे दोन्ही खर्च होतात. त्यामुळे रिक्त पदे लवकरात लवकर भरावीत, अशी आमची मागणी आहे.- भास्कर गोळे, उपजिल्हाध्यक्ष, बळीराजा शेतकरी संघटना

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई