शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 17:47 IST

CM Devendra Fadnavis Navi Mumbai Airport Inaugural News: महाराष्ट्राचा जीडीपी एक टक्क्याने वाढवण्याची क्षमता नवी मुंबई विमानतळात आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

CM Devendra Fadnavis Navi Mumbai Airport Inaugural News: आजचा दिवस हा स्वप्नपूर्तीचा आहे. गेल्या दहा वर्षांपासून ज्या गोष्टी आम्ही सांगतो आहोत, त्या गोष्टींचे लोकार्पण आज होत आहे. ही खऱ्या अर्थाने आनंदाची गोष्ट आहे. नवी मुंबईचेविमानतळ हे नवभारताचे प्रतीक आहे. या विमानतळाची संकल्पना नव्वदीच्या दशकातली होती. महाराष्ट्राचा जीडीपी एक टक्क्याने वाढवण्याची क्षमता हे विमानतळ ठेवते, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे  लोकार्पण झाले. यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात आणि महाराष्ट्रात सरकार आले, तेव्हा जी प्रगतीची कामे सुरू झाली, त्यात नवी मुंबई विमानतळ घ्यावे अशी विनंती आम्ही केली. पंतप्रधान मोदींनी आमची विनंती मान्य केली. त्यानंतर १० वर्षांमध्ये ८ एनओसी अशा होत्या, ज्या या विमानतळाची सुरुवात करण्यासाठी हव्या होत्या. पण त्या मिळत नव्हत्या. मोदींनी याची पहिली बैठक घेतली. त्यानंतर काही तासांत सात एनओसी मिळाल्या. त्यावर त्यांनी आठव्या एनओसीसंदर्भात प्रश्न उपस्थित केले. प्रशासनाने त्यावर काम केले आणि १५ दिवसांत आठवी एनओसी मिळवली. जे दहा वर्षे झाले नव्हते ते मोदींच्या एका बैठकीत झाले. अत्यंत सुंदर असे विमानतळ या ठिकाणी बांधले. कोट्यवधीची प्रवासी क्षमता असलेले हे विमानतळ आहे. महाराष्ट्र आणि भारताच्या विकासात हे विमानतळ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, असे प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नवी मुंबई विमानतळाजवळ तिसरी मुंबई आणि चौथी मुंबई...

महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. नागरी उड्डाण मंत्रालयाचे आभार मानतो. नागरी उड्डाण मंत्री के. नायडू मघाशी म्हणाले की, आपले पुढचे लक्ष्य हे वाढवण बंदर असेल. हे बंदर पंतप्रधान मोदी यांनी आपल्याला भेट म्हणून दिले आहे. तिथेच देशातील पहिले ऑफशोर विमानतळ उभारणार आहोत. नवी मुंबई विमानतळाजवळ तिसरी मुंबई होणार आहे. वाढवणजवळ चौथी मुंबई होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान, या विमानतळासाठी आपण डोंगर सपाट केला, नदीचे पात्र वळवले, अशा अनेक गोष्टी केल्या. मी खात्रीने सांगतो की हे एक विमानतळ महाराष्ट्राचा जीडीपी एका टक्क्याने वाढवू शकतो. या विमानतळाला आता वॉट टॅक्सीची सुविधा मिळणार आहे. हे विमानतळ इंजिनिअरिंग मार्वल आहे. पंतप्रधान मोदी हे महाराष्ट्राच्या पाठीशी पहाडासारखे उभे राहतात. त्यामुळे महाराष्ट्र पुढे जात आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. 

English
हिंदी सारांश
Web Title : CM announces 'fourth Mumbai' after Navi Mumbai airport inauguration.

Web Summary : CM Fadnavis, at the Navi Mumbai airport launch, credited PM Modi for swift approvals. He announced plans for a 'third Mumbai' near the airport and a 'fourth Mumbai' near the upcoming Vadhavan port, envisioning significant GDP growth.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNavi Mumbaiनवी मुंबईAirportविमानतळBJPभाजपाMahayutiमहायुती