शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

वाशी रेल्वे स्टेशनसमोरील साफसफाई पालिका करणार

By admin | Updated: September 11, 2015 01:42 IST

वाशी रेल्वे स्टेशनसमोरील फोर कोर्ट व पार्किंग वगळता इतर परिसर सिडकोने महापालिकेकडे हस्तांतर केला आहे. या परिसरातील दैनंदिन साफसफाई व पावसाळी गटारांमधील गाळ

नवी मुंबई : वाशी रेल्वे स्टेशनसमोरील फोर कोर्ट व पार्किंग वगळता इतर परिसर सिडकोने महापालिकेकडे हस्तांतर केला आहे. या परिसरातील दैनंदिन साफसफाई व पावसाळी गटारांमधील गाळ काढण्याचे काम महापालिका करणार आहे. यासाठी वार्षिक ६० लाख ८४ हजार रुपये खर्चाच्या प्रस्तावास सर्वसाधारण सभेने बुधवारी मंजुरी दिली आहे. नवी मुंबईमधील साफसफाईचे काम व्यवस्थित व्हावे यासाठी महापालिकेने शहरात ९१ ठेकेदारांची विभागवार नियुक्ती केली आहे. या ठेकेदारांकडून दैनंदिन साफसफाई व पावसाळापूर्वी नालेसफाई करून घेतली जात आहे. शहरातील रेल्वे स्टेशन व त्याचा परिसर अद्याप सिडकोच्या ताब्यात असल्यामुळे त्या ठिकाणी सिडकोकडून साफसफाई केली जात आहे. पार्किंगचे भूखंडही त्यांच्याच ताब्यात आहेत. शहरातील पहिले व सर्वात मोठे रेल्वे स्टेशन म्हणून वाशीची ओळख आहे. येथील फोर कोर्ट एरिया वगळून उर्वरित परिसर आता महापालिकेकडे हस्तांतर करण्यात आला आहे. या परिसरातील रस्ते, पदपथ व पावसाळापूर्व गटारांची सफाई करण्याची जबाबदारी पालिकेकडे आली आहे. शहरातील महत्त्वाच्या परिसरामध्ये वाशी रेल्वे स्टेशनचा समावेश आहे. देशातील बहुतांश सर्व राज्यांचे भवन याच परिसरात आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रदर्शनी केंद्र, सर्वाधिक गर्दी असणारे मॉल, आयटी सेंटर असल्यामुळे रोज हजारो नागरिकांची ये - जा येथून होत असते. यामुळे परिसरात चांगल्याप्रकारे साफसफाई ठेवणे आवश्यक आहे. पालिकेने यासाठी साफसफाईचा प्रस्ताव तयार केला आहे. रेल्वे स्टेशनसमोरील सेक्टर ३० व ३० ए या परिसरातील रस्त्यांची लांबी १०,६३३ मीटर, पदपथांची लांबी ८३७७ मीटर, २७ बिट आहेत. यासाठी जवळपास ५० लाख ८५ हजार ५०९ रुपये खर्च अपेक्षित आहे. या परिसरात १.२५ व २.५ मीटर रुंदीचे १९८५ मीटर लांबीचे पावसाळी पाणी वाहून नेणारी गटारे आहेत. त्यांच्या सफाईसाठी ९ लाख ९८ हजार ९३३ रुपये खर्च अपेक्षित आहे. दोन्ही कामांसाठी वार्षिक ६० लाख ८४ हजार रुपये खर्च होण्याची शक्यता आहे. सर्वसाधारण सभेने बुधवारी या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी दिली असून लवकरच यासाठी निविदा मागविण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)