शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांसाठी स्वच्छता स्पर्धा, महापालिकेचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 03:40 IST

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये घनकचरा व्यवस्थापनात देशातील सर्वोत्तम शहराचा बहुमान लाभलेल्या नवी मुंबई शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेची सवय कायमस्वरूपी राहवी, याकरिता मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण केली जात असून, त्यासाठी विविध उपक्र मांचे आयोजन करण्यात येत आहे.

नवी मुंबई  - स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये घनकचरा व्यवस्थापनात देशातील सर्वोत्तम शहराचा बहुमान लाभलेल्या नवी मुंबई शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेची सवय कायमस्वरूपी राहवी, याकरिता मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण केली जात असून, त्यासाठी विविध उपक्र मांचे आयोजन करण्यात येत आहे.देशभरात मोठ्या प्रमाणावर श्रीगणेशोत्सव साजरा होत असून, सार्वजनिक गणेशोत्सवाची फार मोठी परंपरा रूढ आहे. या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नोंदणीकृत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये स्वच्छतेच्या अनुषंगाने निकोप स्पर्धा व्हावी व यामधून स्वच्छतेचा संदेश प्रसारित व्हावा, या दृष्टीने विभागस्तरावर ‘श्रीगणेशोत्सव स्वच्छता स्पर्धा’ आयोजित करण्यात येत आहे. १३ ते २३ सप्टेंबर या कालावधीत संपन्न होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये ज्या मंडळांमार्फत पर्यावरणपूरक श्रीगणेशमूर्तीं (शाडू मातीच्या)ची स्थापना करण्यात येईल, त्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. स्पर्धेच्या अनुषंगाने प्रामुख्याने ओला व सुका कचरा वर्गीकरण व त्यावरील प्रक्रि या, स्वच्छता विषयक जनजागृती व पर्यावरणपूरक देखाव्यांचे सादरीकरण, मंडळाच्या सभोवतालच्या परिसराची स्वच्छता, परिसरात वृक्षारोपण मोहिमांचे आयोजन, स्वच्छता विषयक जनजागृतीपर सामाजिक उपक्र म राबविणे, तसेच स्वच्छता अ‍ॅप डाउनलोड करणे, अशा निकषांचा समावेश आहे.महानगरपालिकेच्या बेलापूर, नेरु ळ, वाशी, तुर्भे(सानपाडा नोडसह), कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली व दिघा अशा आठही विभागांमध्ये स्वतंत्रपणे घेण्यात येणार असून, संबंधित सहायक आयुक्त तथा विभाग अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली परीक्षण समिती गठित करण्यात आली आहे. त्यांच्या समवेत या समितीत सार्वजनिक शौचालय व मलनि:सारण व्यवस्थापन विभागाचे उप अभियंता, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, बचतगटाचे प्रतिनिधी, स्वच्छाग्रही हे समिती सदस्य असतील. तसेच संबंधित विभागाचे स्वच्छता अधिकारी समितीचे सदस्य सचिव असतील. या विभागस्तरावरील स्वच्छता स्पर्धेत निवडलेल्या विजेत्या प्रथम व द्वितीय क्र मांक प्राप्त करणाºया गणेशोत्सव मंडळांना अनुक्र मे २० व १० हजार रु पयांचे पारितोषिक प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह प्रदान केले जाणार आहे. स्वच्छ व सुंदर नवी मुंबईचा ध्यास घेतलेल्या नवी मुंबईकर नागरिकांनी श्रीगणेशोत्सव उत्साहात साजरा करताना सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत उत्सवातून स्वच्छतेचा पर्यायाने आरोग्यपूर्ण समृद्धीचा संदेश प्रसारित करावा व शाडूची गणेशमूर्ती स्थापन करून स्वच्छता स्पर्धा सहभाग घ्यावा, असे आवाहन महापौर जयवंत सुतार आणि महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या वतीने करण्यात येत आहे.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवNavi Mumbaiनवी मुंबई