शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोचा कुस्तीला ‘धोबीपछाड’

By admin | Updated: July 20, 2015 02:48 IST

गोल्फपासून क्रिकेटपर्यंत सर्व खेळांसाठी मैदाने उपलब्ध असणाऱ्या नवी मुंबईमध्ये कुस्तीची मात्र उपेक्षा सुरू आहे. एपीएमसीनंतर आता

नामदेव मोरे, नवी मुंबईगोल्फपासून क्रिकेटपर्यंत सर्व खेळांसाठी मैदाने उपलब्ध असणाऱ्या नवी मुंबईमध्ये कुस्तीची मात्र उपेक्षा सुरू आहे. एपीएमसीनंतर आता नेरूळमधील आखाडाही बंद पडला आहे. अनधिकृतपणे बहुमजली इमारतींचे बांधकाम सुरू असताना गप्प बसणाऱ्या सिडकोने आखाडा अनधिकृत ठरवून कुस्तीची उपेक्षा सुरूच ठेवली आहे. नवी मुंबईचे नियोजन करताना सिडकोने प्रत्येक नोडमध्ये उद्यान व मैदानाची व्यवस्था केली आहे. अनेक स्पोर्ट्स क्लबना नाममात्र दरामध्ये भूखंड दिले आहेत. गोल्फ कोर्स, क्रिकेट मैदान या आधुनिक खेळांसाठीही मैदाने उपलब्धता करून दिली आहे. परंतु महाराष्ट्राची खरी ओळख असणाऱ्या कुस्तीसाठी मात्र एकही आखाडा तयार करण्यात आलेला नाही. राज्याच्या व देशाच्या कानाकोपऱ्यातून नागरिक नवी मुंबईमध्ये राहण्यासाठी आले आहेत. यामध्ये कुस्तीची आवड असणारे हजारो खेळाडू आहेत. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या माथाडी कामगारांना या खेळाची प्रचंड आवड आहे. पोलीस व इतर सरकारी आस्थापनांमध्ये अनेक कुस्ती खेळाडू कार्यरत आहेत. विद्यमान खेळाडू व भविष्यात या खेळात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या खेळाडूंना सराव करण्यासाठी कुठेच जागा नाही. ही गैरसोय लक्षात घेऊन सम्राट स्पोर्ट अ‍ॅकॅडमीने नेरूळ सेक्टर ६ शुश्रूषा रुग्णालयाला लागून असलेल्या सिडकोच्या भूखंडावर तात्पुरता आखाडा तयार केला होता. त्यासाठी रीतसर भाडे भरून जागा ताब्यात घेतली होती. या मातीच्या आखाड्यात ५० ते ६० खेळाडू नियमितपणे सराव करण्यासाठी येऊ लागले होते. तात्पुरत्या स्वरूपात आखाडा उपलब्ध झाल्यामुळे खेळाडूंनी जोरात सराव सुरू केला. परंतु अचानक एका निनावी पत्रावरून सिडकोने हा आखाडा अनधिकृत असून तो तत्काळ बंद करण्याचे आदेश सम्राट स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीला दिले. परिणामी काही दिवसांपासून आखाडा बंद झाला आहे. खेळाडूंचा सराव थांबल्यामुळे कुस्तीपटूंनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वास्तविक ज्या भूखंडावर हा आखाडा तयार करण्यात आला त्या ठिकाणी यापूर्वी काही बांधकाम व्यावसायिकांनी अतिक्रमण केले होते. या भूखंडावर लेबर कॉलनी उभारली होती. त्यांच्यासाठी प्रसाधनगृह उभे केले होते. या जागेचा गोडाऊनप्रमाणे वापर सुरू केला होता. परंतु संबंधितांवर कधीही कारवाई करण्यात आलेली नाही. कुस्तीशौकिनांनी रीतसरपणे सिडकोकडून ही जागा तात्पुरत्या स्वरूपात मागितली. आदित्य बापू उनावणे यांनी जवळपास ५ लाख रुपये खर्च करून येथील सर्व कचरा हटवला. त्याठिकाणी मातीचा आखाडा तयार करण्यात आला. राज्यस्तरीय कुस्तीस्पर्धाही या मैदानात झाल्या. सिडको या भूखंडाच्या वापराविषयी धोरण निश्चित करेल तेव्हा तत्काळ भूखंड मोकळा करण्याचे लेखी देऊनही सिडकोने आखाडा बंद केल्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.