सिडकोची आरोग्य सेवा पनवेल महापालिकेकडे हस्तांतरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 04:01 AM2018-07-03T04:01:23+5:302018-07-03T04:01:31+5:30

सिडकोच्या माध्यमातून सुरू असलेल्या आरोग्य सेवा पनवेल महापालिकेला सोमवारपासून हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. यामध्ये नागरी आरोग्य केंद्र, राष्ट्रीय नागरी आरोग्य केंद्र, हिवताप डेंग्यू कार्यक्रम व भटक्या कुत्र्यांची निर्बीजीकरण शस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे.

 CIDCO's Health Service transferred to Panvel Municipal Corporation | सिडकोची आरोग्य सेवा पनवेल महापालिकेकडे हस्तांतरित

सिडकोची आरोग्य सेवा पनवेल महापालिकेकडे हस्तांतरित

Next

पनवेल : सिडकोच्या माध्यमातून सुरू असलेल्या आरोग्य सेवा पनवेल महापालिकेला सोमवारपासून हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. यामध्ये नागरी आरोग्य केंद्र, राष्ट्रीय नागरी आरोग्य केंद्र, हिवताप डेंग्यू कार्यक्रम व भटक्या कुत्र्यांची निर्बीजीकरण शस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे. यासंदर्भात पनवेल महानगर पालिका आयुक्त गणेश देशमुख यांची सिडको वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक पार पडली होती. त्या बैठकीत सिडकोच्या विविध सेवा टप्प्याटप्य्याने हस्तांतरित करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला होता.
पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीत यासंदर्भात हस्तांतरणाचा ठराव तत्कालीन आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या कार्यकाळात घेण्यात आला होता. मात्र विविध कारणास्तव हस्तांतरण लांबणीवर गेले होते. सध्याच्या घडीला हस्तातरामध्ये नागरी आरोग्य केंद्र , कुत्र्यांचे निर्बीजीकरण व हिवताप डेंग्यू कार्यक्र म आदीचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये घनकचरा हस्तांतरित करण्यात आलेला नाही. यासाठी लागणार खर्च पनवेल महानगर पालिका सिडकोला देणार आहे. हस्तांतरणाचा तीन महिन्याचा खर्च ३० लाखांच्या आसपास जाणार आहे. यामध्ये हिवताप डेंग्यूकरिता कार्यक्र माकरिता प्रत्येक महिन्यासाठी सुमारे २२ ते २३ लाख रु पये खर्च येणार आहे . कुत्र्यांचे निर्बीजीकरण प्रक्रि येसाठी ७ लाख २० हजार तसेच उर्वरित नागरी आरोग्य केंद्राच्या बाबतीत खर्चाची जबाबदारी थेट राज्य सरकार उचलत असते. यामुळे तीन महिन्यात पनवेल महानगर पालिकेला जवळजवळ ७० लाखांच्या आसपास खर्च याकरिता उचलावा लागणार आहे. सिडकोमार्फत नियुक्त करण्यात आलेला कंत्राटदारच पालिका हद्दीत ही सेवा देणार आहे. कंत्राटदारावर सिडको, पालिकेचे नियंत्रण असणार आहे.

आरोग्य सेवक, सेविकेचा हस्तांतरणाला विरोध
सिडकोच्या अखत्यारीत कार्यरत असलेल्या आरोग्य सेवक, सेविका यांच्या हस्तांतरणाला रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य रवींद्र विश्वनाथ पाटील यांनी विरोध दर्शविला आहे.
पनवेल, उरण सिडको हद्दीतील द्रोणागिरी, करंजाडे, पुष्पकनगर याठिकाणची लोकवस्ती झपाट्याने वाढत असल्याने नव्याने कर्मचारी नियुक्त करण्याची गरज असताना सिडकोच्या माध्यमातून २३ कर्मचाºयांचे हस्तांतरण पालिकेकडे न करता पालिकेमार्फत नव्याने कर्मचारी नेमण्याची विनंती पाटील यांनी सिडकोच्या मुख्य आरोग्य अधिकाºयांकडे पत्राद्वारे केली आहे.

नागरी आरोग्य केंद्र, हिवताप डेंग्यू कार्यक्र म तसेच कुत्र्यांचे निर्बीजीकरण आदींचा हस्तांतरण सोमवारपासून करण्यात आलेला आहे. याकरिता लागणारा खर्च पालिका उचलणार आहे. तीन महिन्यांनंतर नव्याने टेंडर काढून नवीन कंत्राटदार नियुक्त करण्यात येणार असून कचरा हस्तांतरणाचा निर्णय देखील दोन ते तीन महिन्यात सोडविला जाईल.
- गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महापालिका

Web Title:  CIDCO's Health Service transferred to Panvel Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cidcoसिडको