सिडकोच्या स्वप्नपूर्ती गृहप्रकल्पात सिलेंडरच्या रेग्युलेटरला आग; एक जण किरकोळ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 20:45 IST2019-07-25T20:43:51+5:302019-07-25T20:45:17+5:30
अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले.

सिडकोच्या स्वप्नपूर्ती गृहप्रकल्पात सिलेंडरच्या रेग्युलेटरला आग; एक जण किरकोळ जखमी
पनवेल - खारघर शहरातील सेक्टर ३६ मधील सिडकोच्या स्वप्नपूर्ती गृहप्रकल्पातील बिल्डिंग नंबर २२ आणि रूम नंबर ४०१ मध्ये सायंकाळी ७.३० च्या सुमारास अचानक आगीने पेट घेतल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली. शेजाऱ्यांनी खारघर अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिल्यावर अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले.
सिलेंडरच्या रेगल्युलेटरला आग लागल्याने रूममध्ये मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले. यावेळी रूममध्ये असलेला युवक बेशुद्ध पडला. त्याला तात्काळ खारघरमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. संबंधित तरुण आणि त्याचे साथीदार या ठिकाणी भाड्याने राहत आहेत.
पनवेल- सिडकोच्या स्वप्नपूर्ती गृहप्रकल्पात सिलेंडरच्या रेग्युलेटरला आग https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) July 25, 2019