घणसोलीत एका अनधिकृत इमारतीवर सिडकोचा बुलडोझर

By नारायण जाधव | Updated: April 20, 2023 18:10 IST2023-04-20T18:08:53+5:302023-04-20T18:10:39+5:30

घणसोली सेक्टर १६ येथे सर्व्हे क्रमांक ११६, १४१ मध्ये नव्याने आरसीसी इमारतीचे बांधकाम सुरू होते. येथील काही नागरिकांच्या तक्रारीनुसार सिडकोच्या अतिक्रमण विभागाने या इमारतींवर धडक कारवाई केली.

CIDCO bulldozer on an unauthorized building in Ghansoli | घणसोलीत एका अनधिकृत इमारतीवर सिडकोचा बुलडोझर

घणसोलीत एका अनधिकृत इमारतीवर सिडकोचा बुलडोझर

नवी मुंबई : घणसोली ‘एफ’ विभागात घणसोली मशेश्वर नगर येथे आणि कौलआळी स्मशानभूमीनजीक येथील मोक्याच्या ठिकाणी अनधिकृतपणे बांधण्यात येत असलेल्या नव्याने बांधकाम सुरू असलेल्या एका अनधिकृत इमारतींवर सिडकोच्या अनधिकृत बांधकामविरोधी पथकाने गुरुवारी २० एप्रिल रोजी दुपारी धडक कारवाई केली.

घणसोली सेक्टर १६ येथे सर्व्हे क्रमांक ११६, १४१ मध्ये नव्याने आरसीसी इमारतीचे बांधकाम सुरू होते. येथील काही नागरिकांच्या तक्रारीनुसार सिडकोच्या अतिक्रमण विभागाने या इमारतींवर धडक कारवाई केली. सिडकोचे अनधिकृत बांधकामे अतिक्रमण विभागाचे मुख्य नियंत्रक संजय जाधव आणि सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या आदेशानुसार प्रचंड पोलिस बंदोबस्तात धडक कारवाई केली. बुधवारी १९ एप्रिल रोजी एकाच वेळी दोन इमारतींवर कारवाई केल्यानंतर त्याच्या शेजारी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर गुरुवारी दुपारी पोकलनने कारवाई करण्यात आली. कारवाईसाठी दोन पोकलेन, तीन जीप, १० मजूर, सिडकोचे पोलिस कर्मचारी आणि कर्मचारी खाजगी १२ सुरक्षा रक्षक असा बंदोबस्तासाठी फौजफाटा होता.
 

Web Title: CIDCO bulldozer on an unauthorized building in Ghansoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.