शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या अलिबाग दौऱ्यात काँग्रेसची निर्दशने?

By admin | Updated: July 3, 2017 06:40 IST

येथील खासगी डॉक्टरांच्या अनास्थेचा बळी ठरलेल्या युवकाच्या कुटुंबीयांनी आत्मदहनाचा दिलेला इशारा, अलिबाग येथील नाट्यगृहाने

विशेष प्रतिनिधी / लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : येथील खासगी डॉक्टरांच्या अनास्थेचा बळी ठरलेल्या युवकाच्या कुटुंबीयांनी आत्मदहनाचा दिलेला इशारा, अलिबाग येथील नाट्यगृहाने वाढीव अनधिकृत बांधकाम करूनही, त्या नाट्यगृहाला अलिबाग नगरपरिषदेच्या हक्काचे चार कोटी ७५ लाख रुपयांचे दिलेले अनुदान याविरोधात काँग्रेसने निर्दशने करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ७ जुलै रोजीचा संभाव्य अलिबाग दौरा चांगलाच चर्चेमध्ये आला आहे. काँग्रेसचे नेते मधुकर ठाकूर यांनी याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाला लेखी कळविले असल्याने काँग्रेस याप्रश्नी आक्र मक असल्याचे दिसून येते. अलिबाग येथे या नाट्यगृहाच्या कार्यक्र मास उपस्थित राहावे किंवा कसे? याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाने रायगड जिल्हा प्रशासनाचा अहवाल मागविला आहे. अलिबाग जिल्हा रु ग्णालयात मणक्यावरील शस्त्रक्रि येदरम्यान मार्च २०१६मध्ये मृत्यू झालेल्या सूरज पाटील यांच्या मृत्यूप्रकरणामध्ये अलिबाग येथील खासगी रुग्णालय चालविणारे डॉ. चंद्रकांत साठे हे सरकारच्या चौकशी अहवालमध्ये दोषी आढळल्याने त्यांची वैद्यकीय व्यवसाय नोंदणी रद्द करण्याबाबतही सरकारने आदेश देऊनही आता जिल्हास्तरीय विशेषतज्ज्ञ समिती गठित करून डॉ. साठे यांना निर्दोष ठरविले आहे. गेली दीड वर्षे न्यायासाठी झगडणाऱ्या मृत सूरजच्या कुटुंबावर सरकारकडून अन्याय होत असल्याची भावना झाली आहे. अलिबाग येथे मुख्यमंत्री अथवा मंत्री येणार असतील, तर त्यांच्यासमोर संपूर्ण कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा मृत सूरज यांच्या कुटुंबीयांनी जिल्हा प्रशासनास दिला होता. त्यांना ३ जुलैला जिल्हा शल्य चिकित्सकांनी चर्चेसाठी बोलाविले आहे. अलिबाग येथे ज्या खासगी सहकारी संस्थेच्या नाट्यगृहाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री येण्याचे प्रयोजन आहे. त्या नाट्यगृहाला आठ हजार चौरस फुटांचे बांधकाम अनुज्ञेय असताना, २५ हजार चौरस फुटांचे बांधकाम करून १७ हजार चौरस फुटांचे वाढीव अनधिकृत बांधकाम केल्याने या नाट्यगृहाला कोट्यवधींचे सरकारी अनुदान देऊ नये, अशी तक्र ार काँग्रेसतर्फे जिल्हाधिकाऱ्यांसह सरकारकडे याआधीच केली. सरकारच्या धोरणानुसार हे अनुदान स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून नगरपरिषदेस मिळणे अपेक्षित असताना, खासगी संस्थेस दिल्याने काँग्रेसने नाट्यगृहाच्या उद्घाटनात निदर्शने करण्याचा इशारा दिला. स्ट्रक्चरल आॅडिट नाहीनाट्यगृहाच्या इमारतीला तब्बल १३ वर्षे झाली आहेत. त्याच जुन्या इमारतीला फक्त रंगरंगोटी करून सजविल्याने स्ट्रक्चरल आॅडिट करण्याची मागणी मधुकर ठाकूर यांनी महिन्यापूर्वी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे, असे असतानाही स्ट्रक्चरल आॅडिट केले गेले नाहीनाट्यगृहाच्या वाढीव अनधिकृत बांधकामाच्या तक्र ारीबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग, उपअधीक्षक,भूमिअभिलेख व महसूल विभाग यांच्यासह संयुक्त पाहणी करण्याची शिफारस सरकारला केल्याचेही ठाकूर यांनी सांगितले.