सायन-पनवेल महामार्गावर केमिकलचा टँकर पलटी, वाहतुकीची कोंडी

By नामदेव भोर | Updated: July 28, 2023 07:58 IST2023-07-28T07:57:23+5:302023-07-28T07:58:29+5:30

हायड्रॉलिक केमीकल घेऊन जाणा-या टँकर वरील चालकाचा तोल सुटल्याने उरण फाटा पुलाजवळ अपघात झाला.

Chemical tanker overturned on Sion-Panvel highway, traffic jam in highway | सायन-पनवेल महामार्गावर केमिकलचा टँकर पलटी, वाहतुकीची कोंडी

सायन-पनवेल महामार्गावर केमिकलचा टँकर पलटी, वाहतुकीची कोंडी

नवी मुंबई : सायन पनवेल महामार्गावर उरण फाटा येथे पहाटे केमीकल चा टँकर पलटी झाली. केमीकल च्या धुराने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.
         
पावसामुळे महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. शुक्रवारी पहाटे हायड्रॉलिक केमीकल घेऊन जाणा-या टँकर वरील चालकाचा तोल सुटल्याने उरण फाटा पुलाजवळ अपघात झाला. बेलापूर  अग्निशमन दलाच्या वाहनांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघाताच्या ठिकाणी धूर झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. टँकर रोडच्या मध्येच कलंडल्याने सकाळी महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी कसरत करावी लागत होती. तुर्भे पुलावर ही अपघात झाल्यामुळे तेथेही वाहतूक कोंडी झाली होती. सकाळीच वाहतूक विस्कळीत झाल्याने कार्यालयात निघालेल्या नागरिकांची ही गैरसोय झाली.
 

Web Title: Chemical tanker overturned on Sion-Panvel highway, traffic jam in highway