शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

उत्साही पक्षिप्रेमींमुळे पामबीच रोडवर अपघातांना मिळतेय आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 04:47 IST

अपघात टाळण्यासाठी वेळेत उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

नवी मुंबई : पामबीच रोडवर नेरुळ व सानपाडा दरम्यान पक्ष्यांसाठी धान्य टाकले जात आहे, यामुळे गत आठवड्यात दोन किरकोळ अपघात झाले असून, भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अपघात टाळण्यासाठी वेळेत उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.नवी मुंबईमधील प्रमुख रस्त्यांमध्ये पामबीच रोडचा समावेश आहे. वाशी ते किल्ला-गावठाण दरम्यान या रोडवर वेगाने वाहने जात असतात. या रोडवर पादचाऱ्यांना जाण्यास मनाई आहे. फेरीवाले व इतर व्यावसायिकांनाही या रोडवर थांबण्यास बंदी घातली आहे. काही महिन्यांपासून नेरुळ ते सानपाडा दरम्यान वाशीकडे जाणाºया रोडवर दोन मोरींवर पक्ष्यांसाठी खाद्य टाकले जात आहे. यामुळे कबुतर व कावळ्यांचा पामबीचवर वावर वाढला आहे. पक्ष्यांचा थवा रोडच्या मध्ये येत असल्यामुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होत आहे. गत आठवड्यामध्ये दोन मोटारसायकल घसरून किरकोळ अपघातही झाला आहे. अशीच स्थिती राहिली तर भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पामबीच रोडवर पक्ष्यांना खाद्य टाकण्यास मनाई करण्यात यावी, अशी मागणी या पूर्वीही प्रवाशांनी केली आहे. पामबीचऐवजी इतर सुरक्षित ठिकाणी पक्ष्यांसाठी खाद्य टाकण्यात यावे, अशी मागणीही केली होती. महापालिका प्रशासन व वाहतूक पोलिसांनीही या ठिकाणी सूचना फलक लावावे, अशी मागणी केली होती; परंतु प्रशासनाने अद्याप या मागणीची दखल घेतलेली नाही. अशीच स्थिती राहिली व भविष्यात अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.पामबीच रोडवर वर्षभर अनेक गंभीर अपघात होत असतात. नेरुळ व सानपाडादरम्यान पक्ष्यांना खाद्य टाकल्यामुळे पक्ष्यांचे थवे येथे जमा होत असून, त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. वाहतूक पोलीस व महापालिका प्रशासनाने पक्षिप्रेमींना आवाहन करून येथे धान्य टाकण्यापासून मनाई केली पाहिजे.- विनय मोरे, प्रवक्ता, सारथी सुरक्षापामबीच रोडवर पक्ष्यांना धान्य टाकल्यामुळे अपघात होण्याची शक्यता असेल तर त्याविषयी पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या जातील, याविषयी योग्य खबरदारी घेतली जाईल.- सुभाष सोनावणे,कार्यकारी अभियंता, महापालिकापामबीच रोडवर पक्ष्यांसाठी धान्य टाकले जात असेल तर त्याची दखल घेऊन आवश्यक उपाययोजना केल्या जातील. पक्षिप्रेमींनाही पामबीचऐवजी इतर ठिकाणी धान्य टाकण्याचे आवाहन केले जाईल. येथे सूचना फलक लावण्यासाठी सूचना दिल्या जातील.- सुनील लोखंडे,उपायुक्त, वाहतूक पोलीस

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई