शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

‘घरबसल्या कमवा‘ स्कीमद्वारे फसवणूक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 06:11 IST

आॅनलाइन एमएलएमच्या माध्यमातून घरबसल्या कमवण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एसटीजी इन्फो कंपनीविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी मुंबई : आॅनलाइन एमएलएमच्या माध्यमातून घरबसल्या कमवण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एसटीजी इन्फो कंपनीविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कंपनीत गुंतवणूक करूनही आश्वासनाप्रमाणे मोबदला मिळालेला नसल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.झटपट श्रीमंतीच्या प्रयत्नात असलेल्यांना गंडा घालण्याचे प्रकार देशभर घडत आहेत. अशाच एका प्रकारे नवी मुंबईत यापूर्वी अनेकांना काही बोगस कंपन्यांनी गंडा देखील घातलेला आहे. त्यानंतरही जादा नफ्याचे आमिष दाखवणाºया आॅनलाइन कंपनीत गुंतवणुकीच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार सुरूच आहेत. अशाच एका प्रकारे फसवणूक झाल्याची तक्रार रतिरंजन राऊत यांनी एपीएमसी पोलिसांकडे केली आहे. वाशीतील सतरा प्लाझा येथील हॉटेलमध्ये त्यांची काही व्यक्तींसोबत ओळख झाली होती. यावेळी सदर व्यक्तींनी ते एसटीजी कंपनीचे एजंट असल्याचे सांगून या कंपनीत गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळत असल्याचे सांगितले. कंपनीत ठरावीक रक्कम जमा केल्यानंतर कंपनीच्या संकेतस्थळावर झळकणाºया जाहिरातींवर क्लीक करण्यास सांगितले होते. यानुसार राऊत यांनी सदर कंपनीत सुमारे तीन लाख रुपये जमा केले होते. यानंतर काही महिने त्यांना संकेतस्थळावरील जाहिरातींवर क्लीक केल्याचा मोबदला देखील मिळाला. परंतु त्यानंतर मार्च महिन्यापासून कामाचा मोबदला मिळणे बंद झाल्याने राऊत यांनी कंपनीच्या एजंटकडे तसेच कार्यालयात चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली. अखेर त्यांनी कंपनीसंदर्भात चौकशी केली असता, त्यांना देशात गुंतवणूक करण्यास अनुमती नसल्याचे स्पष्ट झाले. यानुसार रतिरंजन राऊत यांनी सदर कंपनी व कंपनीचे एजंट यांच्याविरोधात एपीएमसी पोलिसांकडे तक्रार केली आहे. या प्रकारात राऊत यांची १ लाख ६६ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे.