शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम व्यावसायिकाने केली फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 02:07 IST

पनवेल तालुका व इतर परिसरातील इमारतीमध्ये व चाळीमध्ये स्वस्तात घर देतो, असे सांगून अनेक भामट्या बिल्डरांनी गेल्या तीन वर्षांत हजारो ग्राहकांना कोट्यवधी रु पयांना चुना लावला आहे.

पनवेल : पनवेल तालुका व इतर परिसरातील इमारतीमध्ये व चाळीमध्ये स्वस्तात घर देतो, असे सांगून अनेक भामट्या बिल्डरांनी गेल्या तीन वर्षांत हजारो ग्राहकांना कोट्यवधी रु पयांना चुना लावला आहे. फसव्या जाहिरातींना भुलून ग्राहकांनी आपल्या आयुष्याची पुंजी लावली आहे. अशाच प्रकारे नवीन पनवेल येथील बांधकाम व्यावसायिक ब्रिजेश नायरविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खांदेश्वर पोलीस ठाण्यात फसवणूक करणाºया बिल्डरांविरोधात जवळपास ५० गुन्हे दाखल आहेत. स्वस्तात घर देण्याचे आमिष दाखवून शेकडो नागरिकांना भुलवले जात आहे. खोपोली येथे राहणारे युवराज रामचंद्र साळवी (४०) यांनी नवीन पनवेल येथे बांधकाम व्यावसायिकाचे कार्यालय थाटलेल्या ब्रिज किंग कन्स्को प्रायव्हेट लिमिटेडकडे २०१५ मध्ये ३ लाख ५६ हजार ५०० रु पये बुकिंग रक्कम भरून १ बीएचके बुक केले होते. मात्र, दोन वर्षे उलटून गेली तरी देखील या इमारतीचे बांधकाम काही केल्या सुरू होत नव्हते. त्यानंतर या कार्यालयातील राकेश वाडकर यांनी पुन्हा एकदा युवराज साळवी यांना फोन करून नवीन इमारतीच्या योजनेची माहिती सांगितली. २० टक्के बुकिंग रक्कम देऊन उरलेली ८० टक्के रक्कम ताबा दिल्यानंतर भरण्यास सांगितले. त्यानुसार साळवी यांनी सुरु वातीला बुक केलेला १ बीएचके रूम रद्द करून नवीन योजनेनुसार ३० लाख रु पये किंमत असलेला २ बीएचके रूम बुक केली. साळवी यांनी यापूर्वी ३ लाख ५६ हजार ५०० रु पये भरले होते त्यात आणखी १ लाख ५० हजार रु पये भरून २० टक्के रक्कम पूर्ण केली. असे एकूण ५ लाख ६ हजार ५०० रुपये भरून देखील साळवी यांना रूम बांधून देण्यास टाळाटाळ करण्यात आली. तसेच इमारतीचे काम देखील सुरु करण्यात आले नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे साळवी यांच्या लक्षात आले. साळवी यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात बांधकाम व्यावसायिक ब्रिजेश नायर व राकेश वाडकर यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार के ली. त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.