शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

शहरात महागड्या कारला पसंती

By admin | Updated: April 11, 2016 01:42 IST

नवी मुंबईकरांच्या बदल्या जीवनशैलीनुसार महागड्या कारची मागणी वाढत असून, त्यामध्ये इम्पोर्टेड (आयात) कारचाही समावेश आहे.

सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबईनवी मुंबईकरांच्या बदल्या जीवनशैलीनुसार महागड्या कारची मागणी वाढत असून, त्यामध्ये इम्पोर्टेड (आयात) कारचाही समावेश आहे. त्यानुसार दोन वर्षांत ९० इम्पोर्टेड कारची नोंदणी वाशी आरटीओ कार्यालयात झालेली आहे. याशिवाय कार घेण्याची कुवत असतानाही केवळ पार्किंगच्या गैरसोयीमुळे अनेकांकडून दुचाकीला प्राधान्य मिळत असल्याचे दोन वर्षांतल्या नोंदीवरून स्पष्ट होत आहे.मुंबईला पर्यायी शहर म्हणून नवी मुंबई शहराची निर्मिती करण्यात आलेली आहे. परंतु शहर निर्माण करताना नियोजनाचा अभाव ठरल्याचे गत काही वर्षांत उघड होऊ लागले आहे. शहराच्या नियोजनातील अशा त्रुटींच्या अभावाचा काहीसा फटका नागरिकांच्या जीवनशैलीवरही पडू लागला आहे. मागील काही वर्षांत नवी मुंबईकरांच्या जीवनशैलीत कमालीचा बदल झाला आहे. शहरातली शिक्षण व्यवस्था व उद्योग व्यवसायामुळे अनेकांचे राहणीमान उंचावलेले आहे. यावेळी प्रतिष्ठेचा भाग, आवड किंवा गरज म्हणून खासगी कार खरेदीत महागड्या कारला पसंती दर्शवली जात आहे. मागील दोन वर्षांत नवी मुंबई आरटीओकडे ५० लाखांवरील २३२ कारची नोंद झालेली आहे. यामध्ये रोल्स रॉयस, रेंज रोवर, जागुअर, मर्सिडिज अशा कारचा समावेश आहे. काही वर्षांपूर्वी मोजक्याच व्यक्तींकडे दिसणाऱ्या या सर्वाधिक महागड्या कारची संख्याही सद्य:स्थितीला वाढला आहे.एप्रिल २०१५ ते फेब्रुवारी २०१६ दरम्यान नवी मुंबई आरटीओमध्ये ९ हजार ७९४ कारची नोंद झाली आहे. त्यामध्ये ५० लाखांवरील १३४ कार असून ४५ कार इम्पोर्टेड आहेत. तर २०१४-१५ या आर्थिक वर्षात ९० लाखांवरील ९८ कारची नोंद झालेली असून, त्यामध्येही ४५ कार इम्पोर्टेड आहेत. यावरून नवी मुंबईकरांची महागड्या कारची मागणी वाढत असल्याचे दिसत आहे. परंतु कारच्या तुलनेत दुचाकीच्या नोंदीचा आकडा सर्वाधिक आहे. एप्रिल २०१५ ते फेब्रुवारी २०१६ दरम्यान २२ हजार १६४ नव्या दुचाकीची नोंद झालेली आहे. त्यामध्ये हार्ले डेविडसन, रॉयल इन्फिल्ड, पल्सर या दुचाकींचा समावेश असून, त्यांची किंमत ९० हजार ते ७ लाख रुपयांपर्यंतची आहे. महागड्या दुचाकींना पसंती दर्शवणाऱ्यांपैकी अनेकांची कार घेण्याची कुवत असतानाही त्यांच्याकडून दुचाकीला प्राधान्य मिळालेले आहे. याकरिता राहत्या परिसरात पार्किंगची समस्या हे मुख्य कारण आहे.सद्य:स्थितीला नवी मुंबई ही सिडको विकसित नोड व मूळ गाव अशा दोन भौगोलिक भागात विभागली आहे. परंतु पार्किंगची समस्या मात्र दोन्ही ठिकाणी सारखीच आहे. पुरेशा नियोजनाअभावी विकसित नोडमध्ये पार्किंगची सोय नसल्याने रस्त्यालगत वाहने उभी केली जात आहेत, तर काही इमारतींमध्ये पार्किंगच्या जागेत अतिक्रमण झाल्यामुळे पार्किंगची समस्या भेडसावत आहे.