शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

शाडूच्या मूर्तींचे माहेरघर चिरनेर कलानगर

By admin | Updated: July 21, 2015 04:11 IST

गणेशोत्सवाला दोन महिन्यांपेक्षाही कमी कालावधी उरला आहे. त्यामुळे चिरनेर-कलानगरातील गणेशमूर्ती घडविणाऱ्या कारागिरांचे हात यंत्रवत चालायला

उरण : गणेशोत्सवाला दोन महिन्यांपेक्षाही कमी कालावधी उरला आहे. त्यामुळे चिरनेर-कलानगरातील गणेशमूर्ती घडविणाऱ्या कारागिरांचे हात यंत्रवत चालायला लागले आहेत. शाडूच्या गणेशमुर्ती बनविण्यासाठी नजिकच्या काळात चिरनेर चांगलेच प्रसिद्धीस येऊ लागले आहे. चिरनेरच्या कलानगरीतील अवघी कुटुंबच शाडूच्या गेणशमूर्ती घडविण्यात मग्न झाली आहेत. गणेशाच्या मुर्तीसाठी पेण प्रसिद्ध आहे. मात्र शाडूच्या गणेशमूर्तीसाठी चिरनेर येथील कलानगर हे नाव काही वर्षांपासून प्रसिद्धीस येऊ लागले आहे. चिरनेर म्हटलं की डोळ्यांसमोर येतं ते स्वातंत्र्यसंग्रामातील १९३० साली झालेल्या ऐतिहासिक जंगल सत्याग्रह. त्यामुळे चिरनेर गाव आधीपासूनच ऐतिहासिक गाव म्हणून ओळखलं जातं. त्यात भर पडली ती तेथील प्राचीन गणेशमंदिराची. येथील महागणपतीची किर्ती सर्वदूर पोहचलीय. त्याच ऐतिहासिक चिरनेरमध्येच कलानगर वसलयं. ३५ ते ४० कुटुंबियांचे कलानगर. परंतु प्रत्येक घरात गणेशमूर्ती बनविल्या जातात. या कलानगरातच गणेशमूर्ती बनविण्याचे सुमारे ३०-३५ कारखाने आहेत. पारंपरिक मुर्तीकलेचे बीज कलानगरात घराघरातून जोपासलं जातयं. पिढ्यानपिढ्या सुरु असलेल्या मूर्तीकलेचा व्यवसाय वाढत्या महागाईतही टिकविण्यासाठी मूर्तीकारांना धडपड करावी लागत असली तरी त्याचा परिणाम त्यांच्या मूर्तीकलेवर होताना दिसत नाही. मुर्ती घडविण्यासाठी लागणारी शाडूची माती,रंग आणि कारागिरांच्या मोबदल्यात प्रत्येक वर्षी ३० ते ३५ टक्क्यांनी वाढ होते. त्यामुळे मूर्ती व्यावसायिकांना वाढत्या महागाई बरोबरच घटत्या कारागिरांच्या समस्येलाही सामोरे जावे लागते. मुर्ती घडवून अधिक नफा मिळवून देणाऱ्या प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मुर्तींपेक्षा शाडूच्या मुर्ती बनविण्यात अधिक मेहनत, वेळ आणि पैसा लागतो. (वार्ताहर)