फटाक्यांच्या दुकानासमोर सीसीटीव्ही बसवा - प्रीतम म्हात्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 03:49 IST2017-10-08T03:48:56+5:302017-10-08T03:49:25+5:30
पनवेल शहर तसेच ग्रामीण भागात नागरिकांची दिवाळी सणासाठी लगबग सुरू झाली आहे. पनवेल महापालिकेची परवानगी घेऊन गुजराती शाळेसमोर फटाक्यांची दुकाने उभारली जातात.

फटाक्यांच्या दुकानासमोर सीसीटीव्ही बसवा - प्रीतम म्हात्रे
पनवेल : पनवेल शहर तसेच ग्रामीण भागात नागरिकांची दिवाळी सणासाठी लगबग सुरू झाली आहे. पनवेल महापालिकेची परवानगी घेऊन गुजराती शाळेसमोर फटाक्यांची दुकाने उभारली जातात. या दुकानाच्या समोर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी शेकापचे नगरसेवक प्रीतम म्हात्रे यांनी केली आहे.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी महापालिकेची अग्निशामक दलाची गाडी उभी करण्यात येते. फटाके हे अतिज्वलनशील असून त्यामुळे मोठा अनर्थ घडण्याची भीती असते. त्या अनुषंगाने पनवेल शहरातील फटाक्यांच्या दुकानासमोर सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, अशी मागणी म्हात्रे यांनी केली आहे.