विहिरीत गाडी पडली
By Admin | Updated: January 12, 2017 06:28 IST2017-01-12T06:28:31+5:302017-01-12T06:28:31+5:30
सायन-पनवेल महामार्गावर ठाणानाका परिसरात वाशीच्या दिशेने येणाऱ्या गाडीवरून वाहनचालकाचा ताबा सुटल्याने ही

विहिरीत गाडी पडली
पनवेल : सायन-पनवेल महामार्गावर ठाणानाका परिसरात वाशीच्या दिशेने येणाऱ्या गाडीवरून वाहनचालकाचा ताबा सुटल्याने ही गाडी थेट महामार्गालगत असलेल्या विहिरीत कोसळली. १० जानेवारीला मंगळवारी रात्री ९.३० ते १०च्या सुमारास ही घटना घडली. मोहन चव्हाण असे या वाहनचालकाचे नाव आहे.
पनवेल तालुक्यातील कल्हे गावातील रहिवासी असलेले मोहन चव्हाण वाशी येथील होंडाच्या शो रूममध्ये नोकरीला आहेत. कामावरून सुटल्यानंतर घरी परतत असताना हा अपघात घडला. ठाणानाका येथील उड्डाणपुलावरून उतार आहे, त्यामुळे अचानक गाडीचा ताबा सुटल्याने गाडीने रस्ता सोडून थेट जवळच असलेल्या विहिरीच्या कठड्याला धडक दिली. काही वाहनचालकांनी हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन मोहन चव्हाण यांना गाडीतून बाहेर काढले. मात्र, धडक जोरात बसल्याने गाडी विहिरीत कोसळली.
या अपघातात मोहन चव्हाण हे किरकोळ जखमी झाले आहेत. पनवेल येथील एका खासगी रु ग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आले. बुधवारी सकाळी नवीन पनवेल अग्निशमन दल व पनवेल शहर व स्थानिक कोळी बांधवांच्या मदतीने ही गाडी बाहेर काढली. (प्रतिनिधी)