डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन उमेदवाराने भरला फॉर्म; पळस्पे जीप गटातील उमेदवारी अर्ज भरणाऱ्या ढवळे यांची सर्वत्र चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 18:00 IST2026-01-21T17:59:35+5:302026-01-21T18:00:05+5:30

पळस्पे गटात मागील 10 वर्षात पाण्याचा प्रश्न भेडसावत असल्याने पाणी प्रश्न सोडविण्याची शपथ घेऊन मी उमेदवारी अर्ज भरला असल्याचे अस्मिता ढवळे यांनी सांगितले.

Candidate fills form with water pot on head; Dhavale, who filed nomination form from Palaspe Jeep group, is being discussed everywhere | डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन उमेदवाराने भरला फॉर्म; पळस्पे जीप गटातील उमेदवारी अर्ज भरणाऱ्या ढवळे यांची सर्वत्र चर्चा

डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन उमेदवाराने भरला फॉर्म; पळस्पे जीप गटातील उमेदवारी अर्ज भरणाऱ्या ढवळे यांची सर्वत्र चर्चा

वैभव गायकर,पनवेल: पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे.बुधवार दि.21 रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता.या शेवटच्या दिवसात अनेक उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करीत आपले अर्ज भरले.त्यात पळस्पे जिल्हा परिषद गटातील  महाविकास आघाडीच्या उमेदवार अस्मिता अनिल ढवळे तर पंचायत समिती गणातून विक्रम घरत हे उमेदवार आहेत.उमेदवारांसह महिला कार्यकर्त्यांनी  डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन अनोखे शक्तिप्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज भरीत सर्वांचे लक्ष वेधले.

पळस्पे जिल्हा परिषद गटात  पळस्पे ,कोलखे,पेठ उसर्ली ,शिवकर ,चिखले, डेरवली,कोन, अजिवली ,बोर्ले शेडुंग, भिंगारवाडी ,भेरले ,सांगडे, बेलवली, वारदोली , माची प्रबळ ठाकूरवाडी आदींसह इंडिया बुल्स आणि मॅरेथॉन साई वर्ल्ड या वसाहतींचा समावेश आहे.16 गावे आदिवासी वाड्या आणि वसाहतीचा समावेश असलेल्या या गटात निम्म्यापेक्षा जास्त भागाला पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने या गोष्टीच्या निषेध करीत  अस्मिता ढवळे यांनी अनोख्या अंदाजात आपला उमेदवारी अर्ज भरला.

पळस्पे गटात मागील 10 वर्षात पाण्याचा प्रश्न भेडसावत असल्याने पाणी प्रश्न सोडविण्याची शपथ घेऊन मी उमेदवारी अर्ज भरला असल्याचे अस्मिता ढवळे यांनी सांगितले. पनवेल तालुक्यात पळस्पे ,उसर्ली ,कोन ,आजिवली ,वारदोली,पेठ,कोलखे,नेरे या आठ गणांचा या गावात पाणी समस्या आहे.तर गव्हाण ,वहाळ ,वडघर ,दापोली ,पळस्पे ,कोन ,कर्नाळा ,आपटे ,वावेघर ,पोयंजे ,पालीदेवद ,विचुंबे ,आदई ,नेरे ,वावंजे ,चिंध्रन या 16 गणांचा समावेश आहे.दि.5 फेब्रुवारी रोजी याकरिता मतदान होणार आहे.

शेकाप विरुद्ध भाजप अशीच लढाई 

पनवेल तालुक्यात आजही ग्रामीण भागात शेकापचे वर्चस्व आहे.त्यामुळे भाजपाला शेकापचेच आव्हान या निवडणुकीत असणार आहे.शेकाप महाविकास आघाडीची खरी लढत भाजपसोबत रंगणार आहे.भाजपच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर तर शेकापच्या वतीने माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या खांदयावर निवडणुकांची जबाबदारी असणार आहे.

Web Title : उम्मीदवार ने पानी का घड़ा लेकर भरा नामांकन: जल संकट का विरोध

Web Summary : पल्सपे की उम्मीदवार अस्मिता ढवले ने पानी की कमी का विरोध करते हुए पानी का घड़ा लेकर नामांकन दाखिल किया। उन्होंने 16 गांवों को प्रभावित करने वाली जल समस्या को हल करने का संकल्प लिया। चुनाव में शेकाप बनाम भाजपा, ग्रामीण प्रभुत्व पर ध्यान केंद्रित किया गया है।

Web Title : Candidate Carries Water Pot, Files Nomination: Water Crisis Protest

Web Summary : Asmita Dhavale, a candidate in Palspe, protested water scarcity by carrying a water pot while filing her nomination. She vowed to solve the water issue affecting 16 villages. The election pits Shekap against BJP, with a focus on rural dominance.