ड्रंक अँड ड्राईव्ह करून वाहनाला धडक देणाऱ्या बस चालकाचा मृत्यू
By वैभव गायकर | Updated: April 16, 2025 18:27 IST2025-04-16T18:26:26+5:302025-04-16T18:27:05+5:30
सदर अपघाताबाबत कोणतीही तक्रार नसल्याने ते तेथून निघून गेले.

ड्रंक अँड ड्राईव्ह करून वाहनाला धडक देणाऱ्या बस चालकाचा मृत्यू
लोकमत न्युज नेटवर्क, वैभव गायकर,पनवेल:खारघर सेक्टर 34 मध्ये ड्रंक अँड ड्राईव्ह करून एर्टिगा वाहनाला धडक देणा-या 42 वर्षीय सुजित अनिल दास या बस चालकाचा आकस्मित मृत्यू झाल्याची घटना खारघर मध्ये दि.15 रोजी सकाळी 10 च्या सुमारास घडली.
प्रणाम हॉटेल समोर सेक्टर 34 खारघर येथे गाला ट्रान्सपोर्ट कंपनीची बस क्रमांक एमएच 47 बीएल 9642 चा चालक सुजित अनिल दास ( 42) रा. एमआयडीसी अंधेरी मुंबई याने मद्यधुंद अवस्थेत चालवून इर्टिगा कार क्रमांक एमएच 46 सीयु 1724 ला मागून धडक दिली.या अपघातात कोणीही जखमी झाले नसून , ईरटीगा गाडी चालक यास त्याचे गाडीची नुकसान भरपाई मिळाल्याने व सदर अपघाताबाबत कोणतीही तक्रार नसल्याने ते तेथून निघून गेले.
त्यानंतर बसचे दुसरे चालक गणेश धोंडीबा खिल्लारे मद्यधुंद चालक सुजित दास हे नमूद बस मध्ये झोपले होते. चालक सुजित दास हे झोपलेल्या अवस्थेतच बेशुद्ध झाल्याने त्यास मेडिसिटी हॉस्पिटल खारघर येथे उपचार करता आणले असता डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वी मयत झाल्याचे घोषित केले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक सुर्वे यांनी दिली.