शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
3
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
4
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
5
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
6
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
7
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
8
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
9
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
10
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
11
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
12
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
13
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
14
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
15
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
16
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
17
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
18
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री
19
५० टक्के ट्रम्प टॅरिफचा वार, भारत कसा करणार बचाव? ७ पर्याय अजून खुले; अमेरिका गुडघे टेकेल!
20
संधी साधायची तर...! या ईलेक्ट्रीक कारवर मिळतोय १० लाखांपर्यंतचा डिस्काऊंट...

महापौरांचा मुख्यालयावर बहिष्कार

By admin | Updated: October 6, 2016 03:58 IST

महापालिकेमध्ये लोकप्रतिनिधी व प्रशासनामधील वाद विकोपाला गेले आहेत. सर्वसाधारण सभेच्या व लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा आदर केला जात

नवी मुंबई : महापालिकेमध्ये लोकप्रतिनिधी व प्रशासनामधील वाद विकोपाला गेले आहेत. सर्वसाधारण सभेच्या व लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा आदर केला जात नसल्यामुळे महापौर सुधाकर सोनावणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाची मनमानी थांबेपर्यंत पालिका मुख्यालयामध्ये न जाण्याचा निर्णय घेतला आहे. महापौरांचाही अवमान होत असल्यामुळे शहरवासीयांमध्येही असंतोषाची भावना वाढू लागली असून त्याचा उद्रेक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून प्रथमच लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यामधील संवाद पूर्णपणे थांबला आहे. पालिकेमध्ये आणिबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. मे महिन्यापासून लोकप्रतिनिधी व प्रशासनामध्ये संवाद निर्माण व्हावा यासाठी महापौर सुधाकर सोनावणे यांनी प्रयत्न केले. परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. आयुक्त नगरसेवकांना भेटत नाहीत, त्यांच्या सूचनांचा आदर करत नसल्याच्या तक्रारी अनेक वेळा करण्यात आल्या होत्या. पण आता तर प्रशासनातील इतर अधिकारीही लोकप्रतिनिधींचे मत एकूण घेत नाहीत. काहीही काम सुचविले तरी आयुक्त रागावतील असे सांगून टाळले जात आहे. यामुळे नाराज झालेल्या महापौरांनी सर्वसाधारण सभेने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी होत नसेल व प्रशासन मनमानीपणे कामकाज करणार असेल तर आम्ही पालिकेत जायचेच कशाला असा पवित्रा घेतला आहे. जोपर्यंत प्रशासन लोकप्रतिनिधींचा योग्य आदर करणार नाहीत, तोपर्यंत पालिकेत जाणारच नाही असा निर्धार व्यक्त केला आहे. महापौरांच्या या भूमिकेमुळे पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. या निर्णयाविषयी माहिती देताना महापौर सुधाकर सोनावणे यांनी मे महिन्यापासूनचा घटनाक्रम उलगडून सांगितला आहे. आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यानंतर अद्याप एकदाही भेट घेतलेली नाही. ज्या दिवशी पदभार स्वीकारला त्या दिवशी महापौर स्वत:च आयुक्तांच्या घरी जावून त्यांना भेटले. यानंतरही आयुक्तांनी त्यांची कधीच भेट घेतलेली नाही. यामुळे पुन्हा एकवेळ त्यांच्या निवासस्थानी जावून शहरातील समस्यांवर चर्चा केली. कधीच संवाद होतच नसेल व आम्ही सर्वसाधारण सभेत घेतलेल्या निर्णयांचीही अंमलबजावणी होत नसल्याने फक्त खुर्चीवर बसण्यासाठी पालिकेत जावू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)