Bomb like material found at Panvel station; Local Empty by police hrb | खळबळजनक! पनवेल स्टेशनवर सापडली बॉम्बसदृष्य वस्तू; लोकल रिकामी केली

खळबळजनक! पनवेल स्टेशनवर सापडली बॉम्बसदृष्य वस्तू; लोकल रिकामी केली

पनवेल : पनवेल स्थानकावर प्लॅटफॉर्म नंबर १ वर बॉम्बसदृष्य वस्तू सापडली असून यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. 
पोलिस आणि फायरब्रिगेडचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. संपूर्ण लोकल ट्रेन रिकामी करण्यात आली असून रेल्वे स्थानकही रिकामे करण्यात आले आहे. श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले आहे. 

लोकल परिसरामध्ये पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली आहे. मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून फोटो काढण्यासही मनाई करण्यात आली आहे. फ्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 बंद करण्यात आले असून तीन व चार वरून लोकल ट्रेन सोडण्यात येत आहेत. 

Web Title: Bomb like material found at Panvel station; Local Empty by police hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.