कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 21:02 IST2019-04-15T21:02:02+5:302019-04-15T21:02:25+5:30
मिल परिसर : तरुण अनोळखी, घटनास्थळी पसरली होती दुर्गंधी

कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील मिल परिसरात रेल्वे स्टेशननजिक असलेल्या एका मोठ्या डबक्यात अनोळखी तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला़ ही घटना सोमवारी दुपारी उजेडात आली़ घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबची व्हॅन दाखल झाली होती़ मृतदेह डबक्यातून बाहेर काढल्यानंतर हिरे वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आला़ शवविच्छेदन झाल्यानंतरच घटनेची प्राथमिक माहिती कळू शकेल, असे पोलीस निरीक्षक गणेश चौधरी यांनी सांगितले़
शहरातील रेल्वे स्टेशननजिक राष्ट्रवादी भवनाजवळ कोपºयात एक घाण पाण्याचे मोठे डबके आहे़ शक्यतोअर त्या ठिकाणी कोणीही जाताना दिसत नाही़ दुपारी या भागातून कुजल्यासारखी दुर्गंधी येत होती़
पोलीस घटनास्थळी दाखल
या घटनेची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली़ माहिती मिळल्यानंतर पोलीस निरीक्षक गणेश चौधरी हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले़ त्यावेळेस घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली होती़ इतरांच्या मदतीने पाण्यात असलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला़ त्याची ओळख पटविण्याचा प्रयत्न यावेळी पोलिसांकडून करण्यात आला़ पण, कोणीही पुढे आले नाही़ घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबचे व्हॅन दाखल झाली होती़ रुग्णवाहिकेने मृतदेहाला शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले़ अकस्मात मृत्यूच्या नोंदीनंतर रेल्वे पोलिसांकडे प्रकरण वर्ग होईल़