शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

तळोजामधील चौघांचे मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 11:55 PM

तळोजा येथे पत्नी आणि दोन मुलांची हत्या करून आत्महत्या करणाऱ्या पतीविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पनवेल : तळोजा येथे पत्नी आणि दोन मुलांची हत्या करून आत्महत्या करणाऱ्या पतीविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत इसमाचे नातेवाईक यांना दिल्लीहून पोलिसांनी तळोजा येथे बोलावले होते. त्यांच्याकडे चौकशी करून त्यांनी हे पाऊल का उचलले याची माहिती पोलिसांना मिळालेली नाही.दरम्यान, मृत नीतेश कुमार उपाध्याय याचा गेल्या दोन वर्षांपासून त्याच्या नातेवाइकांशी संपर्क झाला नसल्याचे उघड झालेले आहे. २४ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली असून, या घटनेमुळे पनवेल परिसरात एकच खळबळ उडाली होती. आठ दिवसांनंतरही हत्या व आत्महत्येची माहिती मिळालेली नसल्याने पोलिसांसमोर याबाबत अजूनही प्रश्नचिन्हच आहे.मयत नीतेश कुमार यांचा भाऊ रत्नेश याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली. त्यांनी आत्महत्या का केली असेल, तसेच पत्नी व मुलांना का मारले असेल, याची माहिती रत्नेशकडून घेतली असता कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. तळोजा पोलिसांनी या चौघांचे मृतदेह भाऊ रत्नेश याच्या ताब्यात दिले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजू अडागळे यांनी दिली.