लैंगिक शोषणासाठी मुलीला ब्लॅकमेल; अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल
By सूर्यकांत वाघमारे | Updated: March 17, 2024 16:33 IST2024-03-17T16:33:37+5:302024-03-17T16:33:47+5:30
मॉर्फ केलेल्या फोटोद्वारे ब्लॅकमेल

लैंगिक शोषणासाठी मुलीला ब्लॅकमेल; अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल
नवी मुंबई : तळोजा परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन रिल स्टार मुलीच्या विनयभंगाची घटना घडली आहे. तिचे मॉर्फ केलेले फोटो तिलाच पाठवून ते व्हायरल करण्याची धमकी दिली जात होती. ते टाळण्यासाठी तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली जात होती. याप्रकरणी अल्पवयीन मुलावर तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलांमधील गुन्हेगारी प्रवृत्तीचे दर्शन घडवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलाकडून अल्पवयीन मुलीला लैंगिक शोषणासाठी ब्लॅकमेल केले जात होते. याबाबत मुलीने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीवरून मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळोजा परिसरात राहणारी मुलगी सोशल मीडियावर रिल बनवण्याचे काम करते. तिला एका मुलाकडून सोशल मीडियावर मॅसेज करून मॉर्फ केलेले फोटो पाठवले जात होते. तसेच हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन लैंगिक शोषणासाठी ब्लॅकमेल केले जात होते. अखेर या प्रकरणाला त्रासलेल्या मुलीने पोलिसांकडे तक्रार केली असता हा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे अल्पवयीन मुलांच्या हाती पालकांनी दिलेला स्मार्टफोन धोकादायक ठरत असल्याचेही समोर येत आहे.