शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदाच्या निडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
2
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
3
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
4
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
5
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
6
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
7
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
8
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
9
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
10
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
12
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
13
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू
14
प्रेमाचा त्रिकोण! आमच्या दोघींपैकी एकीला निवड; गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरून पतीने केला मोठा कांड
15
२४ घरं, ४ प्लॉट, ४० एकर शेतजमीन... १५ हजार पगार असलेल्या क्लार्ककडे ३० कोटींचं घबाड
16
एकमेकांना शेवटचं बघताच आलं नाही! अल्जेरियात मुलाचा मृत्यू, मृतदेहाची वाट पाहणाऱ्या वडिलांचेही निधन 
17
एन चंद्रशेखरन यांच्या हाती पुन्हा टाटा सन्सची धुरा; IPO ची वाट पाहणाऱ्यांना पुन्हा एकदा मोठा झटका
18
वडिलांचा मृत्यू, बॉयफ्रेंडसोबत पळाली आई; लेकाची पोलिसांत धाव, म्हणाला, "ते मला मारुन टाकतील..."
19
नोकरी सुरू होताच १५,००० रुपये तुमच्या खात्यात! मोदी सरकारने आणली 'ही' खास योजना, कंपनीलाही मिळेल फायदा!

भाजपचे मताधिक्य वाढले, शेकापची मात्र पिछेहाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 00:52 IST

२०१४ च्या तुलनेत शेकापची सुमारे २५ हजार मते घटली

- मयूर तांबडेपनवेल : पनवेल विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्रशांत ठाकूर यांनी शेकाप आघाडीच्या हरेश केणी यांचा विक्रमी ९२ हजार ३७० मतांनी पराभव केला. गेल्या २०१४ च्या निवडणुकीच्या तुलनेत पनवेलमध्ये भाजपचे मताधिक्य ५३ हजारांनी वाढले असून शेकापचे मताधिक्य गेल्या निवडणुकीपेक्षा २५ हजारांनी कमी झालेले दिसून येत आहे. शहरीकरणाचा फटका शेकापला बसल्याचे या निवडणुकीत दिसून येत आहे.

पनवेलमध्ये २०१९ च्या निवडणुकीत केवळ ५४ टक्के मतदान झाल्याने त्याचा फायदा व नुकसान कोणाचे होते, याची चर्चा रंगू लागली होती. त्यामुळे सर्वांचे लक्ष गुरुवारच्या निवडणूक निकालाकडे राहिले होते. सकाळी ८.१५च्या सुमारास व्ही. के. हायस्कूल येथे मतमोजणीला सुरुवात झाली. या वेळी शेकाप आघाडी व भाजप-सेना कार्यकर्त्यांची तुरळक गर्दी दिसून होती. ९.३०च्या सुमारास दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करण्यास सुरुवात केली.

प्रत्येक फेरीचे निकाल लागत गेले व प्रशांत ठाकूर विजयाची आघाडी घेत गेले. या वेळी भाजपचे झेंडे कार्यकर्ते भिरकवत होते. तर भाजपला मिळत गेलेली आघाडी पाहून शेकापच्या गोटात चिंतेचे वातावरण होते. जवळपास लाखाच्या फरकाने मिळालेला विजय पाहून भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. गुलाल उधळून, फटाके फोडून त्यांनी आनंद व्यक्त केला. प्रशांत ठाकूर विजयी झाल्यानंतर गावागावांत आनंद व्यक्त करण्यात आला.

२०१९ व्या निवडणुकीत भाजपचे प्रशांत ठाकूर यांना एक लाख ७८ हजार ५८१ मते मिळाली. त्यामुळे भाजपचे मताधिक्य गेल्या निवडणुकीपेक्षा ५३ हजार ४३९ मतांनी वाढले. तर शेतकरी कामगार पक्षाचे हरेश केणी यांना या निवडणुकीत ८६ हजार २११ मते मिळाली. २०१४ च्या निवडणुकीत शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांना एक लाख ११ हजार ९२७ मते मिळाली. त्यामुळे या निवडणुकीत २५ हजार ७१६ मतांनी शेकापचे मताधिक्य कमी झाले आहे. या निवडणुकीत कमी झालेल्या मतदानामुळे शेकापवर आत्मचिंतनाची वेळ आली आहे.

रायगड जिल्ह्यात शेकापचा एकही आमदार निवडून आलेला नाही. पनवेल, उरण, पेण, अलिबाग या चार तालुक्यांतील शेकापच्या उमेदवाराचा पराभव झालेला आहे. शेकापचे पेण येथील विद्यमान आमदार धैर्यशील पाटील व अलिबागचे विद्यमान आमदार पंडित पाटील यांचाही या निवडणुकीत पराभव झालेला आहे. तर उरण येथे माजी आमदार विवेक पाटील यांचा दुसऱ्यांदा पराभव झालेला आहे.पनवेल विधानसभा निवडणुकीत नोटाला तिसºया क्रमांकाची मते मिळाली. नोटाने १२ हजार ३७१ मते मिळवली. भाजप व शेकाप उमेदवारानंतरची ही सर्वाधिक मते आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019panvel-acपनवेलBJPभाजपा