शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : हिटमॅन रोहितनं मैदानात उतरत इतिहास रचला; पण हेजलवूडनं 'जोश' दाखवला अन्...
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
7
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
8
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
10
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
11
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
12
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
13
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
14
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
15
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
16
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
17
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
18
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
19
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
20
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका

भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर

By नारायण जाधव | Updated: August 29, 2025 07:10 IST

सकल मराठा समाजाचे भगवे वादळ नवी मुंबईत गुरुवारी दाखल होण्याआधीच भाजपने डॅमेज कंट्रोलचे हत्यार उपसले आहे. याचाच एक भाग म्हणून इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत नाही, इतिहास कर्तृत्वाला लक्षात ठेवतो, असे ठळकपणे लिहिलेले बॅनर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोसह लावले आहेत.

- नारायण जाधवनवी मुंबई - सकल मराठा समाजाचे भगवे वादळ नवी मुंबईत गुरुवारी दाखल होण्याआधीच भाजपने डॅमेज कंट्रोलचे हत्यार उपसले आहे. याचाच एक भाग म्हणून इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत नाही, इतिहास कर्तृत्वाला लक्षात ठेवतो, असे ठळकपणे लिहिलेले बॅनर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोसह लावले आहेत.

भाजपचे आमदार तथा माथाडी नेते नरेंद्र पाटील, आ. निरंजन डावखरे, आ. प्रसाद लाड यांच्या नावासह हे होर्डिंग, बॅनर लावले आहे. मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीस यांना व्हिलन ठरविण्याचा आणि त्यांना शिवीगाळ केल्याचे प्रकार घडल्यानंतर भाजपने अशा नेत्यांना या बॅनरच्या माध्यमातून उत्तर देत डॅमेज कंट्रोल' साधल्याचेही बोलले जात आहे. 

माथाडींचाही पाठिंबानवी मुंबईत पनवेल-सायन महामार्गावर मोक्याच्या ठिकाणांवर लागलेल्या या बॅनरवर नाव असलेले माथाडी नेते नरेंद्र पाटील यांचे वडील स्व. अण्णासाहेब पाटील यांनी सर्वप्रथम मराठा आरक्षणासह माथाडी कायद्याची मागणी केली होती. आता याच अण्णासाहेबांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिलेला आहे. एवढेच नव्हे काही वर्षांपूर्वी पाटील यांनी आपल्या हातावर देवेंद्र फडणवीस यांचे नावसुद्धा गोंदवून घेतलेले आहे.

आरक्षणाबाबत काँग्रेसने भूमिका स्पष्ट करावीकाँग्रेसने मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची मराठा आरक्षणाबाबत भूमिका काय आहे तसेच नाना पटोले यांनी ओबीसी आरक्षण कमी करण्याच्या चळवळीला पाठिंबा दिला का, हे स्पष्ट करावे. काँग्रेसने अशी नौटंकी करणे आणि सरड्यासारखे पलटणे हे संभ्रम निर्माण करणारे आहे.चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री

मर्यादा हटवा, आरक्षण द्यासरकारने ठरवले तर पाच मिनिटात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो पण सरकार ते करत नाही. आरक्षणावर जातनिहाय जनगणना हा रामबाण उपाय आहे, हे खा. राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसशासित तेलंगणा व कर्नाटकात तसे काम सुरू आहे. भाजप सरकारने जातनिहाय जनगणना करावी व मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा.- हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणNavi Mumbaiनवी मुंबईDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस