शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

'पवार साहेबांची गणनादेखील बाप बदलणाऱ्या औलादींमध्ये करणार का?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 12:48 IST

गणेश नाईक आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये जुंपली; नाईक यांचा थेट पवारांवर वार

ठळक मुद्देभाजपा नेते गणेश नाईक यांची शरद पवारांवर अप्रत्यक्षपणे टीकागणेश नाईक आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात जुंपलीपवारांच्या पक्षांतरावर भाष्य करत नाईक यांचा आव्हाडांना थेट सवाल

नवी मुंबई: नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादीच्या आजी-माजी नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगलं आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि भाजपा नेते गणेश नाईक यांच्यात चांगलीच जुंपली आहे. बाप बदलणारी औलाद नाही असं म्हणत आव्हाड यांनी नाईक यांच्यावर जहरी टीका केली. या टीकेला प्रत्युत्तर देताना नाईक यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं आहे. पक्षांतर करणाऱ्या शरद पवारांची गणनादेखील बाप बदलणाऱ्या औलादींमध्ये करणार का, असा सवाल नाईक यांनी आव्हाड यांना विचारला आहे. मी पक्ष बदलण्याच्या अनुषंगानं जितेंद्र आव्हाडांनी एक वक्तव्य केलंय की पक्ष बदलणाऱ्यांची औलाद आमची नाही. म्हणजे त्यांनी म्हटलंय की बाप बदलणारी औलाद मी नाही. मात्र माणूस पक्ष एकाएकी बदलत नाही. समाजकारणाला, राजकारणाला गती यावी किंवा स्वाभिमान जतन करता यावा, यासाठी माणूस पक्षांतर करतो, असं नाईक म्हणाले. यानंतर पुढे बोलताना त्यांनी शरद पवार यांनी केलेल्या पक्षांतराचा उल्लेख केला. माननीय शरद पवार साहेब पूर्वी काँग्रेसमध्ये होते. युवकपासून मंत्रिमंडळातसुद्धा ते होते. नंतर समाजकारण, राजकारण गतीमान व्हावं यासाठी त्यांनी एस काँग्रेसची स्थापना केली. त्यांनी पुलोद सरकारचं नेतृत्व केलं आणि कालांतरानं औरंगाबाद मुक्कामी असताना राजीव गांधींच्या उपस्थितीत पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. परत पुढे १९९९ साली स्वाभिमानाच्या मुद्द्यावर त्यांनी पक्ष सोडला आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, असं म्हणत नाईक यांनी पवारांच्या पक्षांतराचा उल्लेख केला. पवार साहेबांनीसुद्धा तीनवेळा पक्ष बदलला आहे. मग पवारसाहेबांची गणनादेखील तुम्ही बाप बदलणाऱ्या औलादीमध्ये करणार का, असा थेट सवाल नाईक यांनी आव्हाडांना विचारला आहे. माणूस गरज म्हणून पक्ष बदलतो. त्यामुळे आव्हाड यांनी अशा प्रकारे खालच्या स्तरावर येऊन भाष्य करू नये, असंही ते पुढे म्हणाले.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारGanesh Naikगणेश नाईकJitendra Awhadजितेंद्र आव्हाडcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस