शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा नगरसेविकेच्या पदास १२ फेब्रुवारीपर्यंत स्थगिती, नवी मुंबईतील प्रकरण काय आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 20:42 IST

ऐन महापौर निवडणूक जवळ आलेली असताना न्यायालयाने भाजपा नगरसेविकेच्या पदाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे त्यांना महापौर पदाच्या निवडणुकीत मतदान करता येणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

Navi Mumbai Municipal Election 2026 : नेरूळ प्रभाग २३ 'ब'मधून निवडून आलेल्या रूपाली यांच्याविरोधात शिंदेसेनेच्या भगत अश्विनी माने यांनी बेलापूर न्यायालयात दाखल केली होती. याचिका भाजप उमेदवारावर अनधिकृत बांधकामाचा आक्षेप घेतला होता.

न्यायालयाने भगत यांच्या पदास १२ फेब्रुवारीपर्यंत स्थगिती दिली आहे. यामुळे त्यांना महापौर निवडीच्या मतदानापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे.

निवडणूक निकालानंतर शिंदेसेनेच्या अश्विनी माने यांनी न्यायालयात धाव घेतली होती. प्रभाग २३ 'ब'मधून निवडून आलेल्या रूपाली किस्मत भगत यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करताना बांधकामाविषयी अनधिकृत माहिती लपवल्याविषयी आक्षेप घेतला आहे. १२ फेब्रुवारीपर्यंत म्हणणे सादर करण्याचे आदेश

बेलापूर न्यायालयाने ही याचिका दाखल केली असून भगत यांना १२ फेब्रुवारीपर्यंत म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

तोपर्यंत त्यांच्या निवडीला स्थगिती राहणार आहे. हा भाजपला धक्का समजला जात असून महापौर निवडीच्या वेळी एक मत कमी होणार आहे. निवडणूक निकालानंतर दाखल झालेल्या याचिकेवर पुढील सुनावणीमध्ये काय होणार याविषयीही आता उत्सुकता निर्माण झाली आहे.

महापौर निवडीकडे सगळ्यांचे लक्ष

महापालिका निवडणुकीमध्ये भाजपचे ६५ नगरसेवक निवडून आले आहेत. १ अपक्षाने पाठिंबा दिल्यामुळे त्यांचे संख्याबळ ६६ झाले आहे.

न्यायालयाने तात्पुर स्थगिती दिल्यामुळे ५ फेब्रुवारीच्या सभेत पुन्हा संख्याबळ एकने कमी झाले आहे.

भाजपविरोधात शिंदेसेनेकडे ४२ नगरसेवक आहेत. मनसेचा १, उद्धवसेनेचे २ असे विरोधातील संख्याबळ ४५ आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Corporator's Post Suspended: Navi Mumbai Case Explained

Web Summary : A Navi Mumbai BJP corporator's position is suspended until February 12th due to alleged unauthorized construction information concealment. This impacts upcoming mayoral elections as court proceedings continue, potentially reducing BJP's strength.
टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporation Electionनवी मुंबई महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६MayorमहापौरBJPभाजपाPoliticsराजकारणNavi Mumbaiनवी मुंबई