शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
6
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
7
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
8
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
9
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
10
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
11
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
12
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
13
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
14
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
15
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
17
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
18
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
19
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
20
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?

चक्काचूर! भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, पामबीचवर वाहनांच्या वेग ठरतोय जीवघेणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 16:22 IST

Accident : पामबीच मार्गावरील घटना

नवी मुंबई : पामबीच मार्गावर करावे येथे भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराच्या मृत्यूची घटना घडली आहे. रविवारी पहाटेच्या ६ च्या सुमारास हा अपघात घडला असून याप्रकरणी कार चालक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकीस्वार चौकात रस्ता ओलांडत असताना भरधाव कारने धडक दिल्याने हा अपघात घडला.पामबीच मार्गावर करावे येथील टी. एस. चाणक्य चौकात हा भीषण अपघात घडला. त्यामध्ये मनोजकुमार वर्मा (२५) हा जागीच मृत पावला आहे. तो करावेचा राहणारा असून दूध वितरक आहे. रविवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तो एनआरआय कॉम्प्लेक्स येथे दूध पोचवून दुचाकीवरून परत करावेकडे येत होता. यावेळी चाणक्य चौकात तो करावेकडे वळण घेत असताना वाशीकडून बेलापूरकडे जाणाऱ्या भरधाव कारने त्याला धडक दिली. अपघातावेळी कार अति वेगात असल्याने मनोजकुमार हा दुसऱ्या लेनवर फेकला जाऊन रस्त्यालगच्या झाडीत अडकला. तर कार देखील अनेक पलट्या घेत विरुद्ध दिशेच्या मार्गावर काही अंतरावर जाऊन पडली. परंतु कारमधील दोघांना किरकोळ दुखापत झाली असून ऐरबॅगमुळे थोडक्यात त्यांचे प्राण वाचले. अपघातानंतर त्याठिकाणी बघ्यांची गर्दी जमली असता, काहींनी रुग्णवाहिकेला देखील कळवले. तर काही वेळातच वाहतूक पोलीस व एनआरआय पोलीस देखील त्याठिकाणी दाखल झाले.गंभीर जखमी अवस्थेतील मनोजकुमार हा सुमारे अर्धा तास मदतीच्या प्रतीक्षेत पडून होता. अखेर निखिल जाधव हा तरुण खासगी रुग्णवाहिका घेऊन आल्यानंतर मनोजकुमारला झाडीतून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तोपर्यंत मदतीच्या प्रतीक्षेत त्याने प्राण गमावले होते. या अपघात प्रकरणी कार चालक अक्षय सुर्वे (२५) विरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो वाशीचा राहनारा असून त्याने भरधाव वेगात कार पळवल्याने हि दुर्घटना घडली. याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी सांगितले.    पामबीचवर रुग्णवाहिकेची कमीपामबीच मार्गावर भरधाव वेगात वाहने पळवली जात असल्याने सातत्याने अपघात घडत आहेत. अशावेळी जखमीला तात्काळ मदत मिळण्यास त्याचे प्राण वाचू शकतात. परंतु बहुतांश अपघातांमध्ये रुग्णवाहिका वेळेवर मिळत नसल्याने जखमींवर वेळीच उपचार होऊ शकले नाहीत. तर अनेकदा नागरिक वेळेवर उपलब्ध वाहनांमधून जखमीला रुग्णालयात दाखल करतात. त्यामुळे पामबीच मार्गावर एकतरी रुग्णवाहिका कार्यरत ठेवण्याची गरज भासत आहे.

वेगावर नियंत्रण नाहीक्वीन नेकलेस म्हणून ओळखला जाणारा पामबीच मार्ग भरधाव वाहनांमुळे जीवघेणा ठरत आहे. चौकांच्या  ठिकाणी सिग्नल असून देखील सिग्नलवर थांबणे काहींना पसंद पडत नाही. त्यामुळे सिग्नल तोडण्यासह, अधिकाधिक वेगात वाहन पळवण्याचा छंद काही चालकांकडून जोपासला जात आहे. त्यातूनच आजवर अनेक अपघात घडले असून त्यात काहींना प्राण देखील गमवावे लागले आहेत.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिसDeathमृत्यूNavi Mumbaiनवी मुंबई