शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
2
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
3
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
4
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
5
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
6
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
7
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
8
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
9
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
10
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
11
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
12
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
13
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
14
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
15
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
16
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
17
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
18
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
19
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
20
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट

टेमघरमध्ये पुन्हा दिसला बिबट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2019 11:25 PM

नोव्हेंबर २०१८ मध्ये तळोजातील कोलटेन कंपनीच्या आवारात बिबट्या दिसला होता. ७ आॅक्टोबर रोजी ओवळे गावातील धर्मा म्हात्रे यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याचे त्यांचे म्हणणे आहे

पनवेल : पनवेल व उरण परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. तालुक्यातील टेमघर गावाजवळ एका तरुणाला गुरुवारी बिबट्या दिसला. याची माहिती दिल्यानंतर वनविभागाकडून परिसरात बिबट्याचा शोध घेण्यात येत असून काही ठिकाणी बिबट्याचे ठसे आढळून आले आहेत.

नोव्हेंबर २०१८ मध्ये तळोजातील कोलटेन कंपनीच्या आवारात बिबट्या दिसला होता. ७ आॅक्टोबर रोजी ओवळे गावातील धर्मा म्हात्रे यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, वनविभागाने बिबट्याचा शोध घेतला असता तो सापडला नाही.तर ३१ आॅक्टोबर रोजी नेरे जवळील टेमघर परिसरात रूपेश गायकर या तरुणाला रस्त्यावर बिबट्या दिसला, त्याने याची माहिती ग्रामस्थांना दिली. तर दुसऱ्या एका व्यक्तीला बिबट्यासोबतच दोन बछडेही परिसरात फिरताना दिसले त्यामुळे लहान मुलांना घराबाहेर सोडण्यास पालक घाबरत आहेत.

वनविभागाने शुक्रवारी सायंकाळपर्यंत बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. या वेळी त्यांना प्राण्याचे ठसे सापडून आले आहेत. मात्र, ते ठसे कोणत्या प्राण्याचे आहेत, याचा शोध सुरू आहे. नागरिकांनी रात्रीच्या वेळेस एकटे फिरू नये, तसेच सोबत बॅटरी, काठी ठेवावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

टॅग्स :leopardबिबट्या