बाप्पा देतोय व्यसनमुक्तीचा संदेश

By admin | Published: September 25, 2015 02:29 AM2015-09-25T02:29:33+5:302015-09-25T02:29:33+5:30

तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कर्करोग होण्याचा धोका वाढतो, याविषयी जनजागृती करूनही अनेकजण व्यसनांच्या जाळ््यात अडकतातच.

Bappa gives the message of addiction | बाप्पा देतोय व्यसनमुक्तीचा संदेश

बाप्पा देतोय व्यसनमुक्तीचा संदेश

Next

मुंबई: तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कर्करोग होण्याचा धोका वाढतो, याविषयी जनजागृती करूनही अनेकजण व्यसनांच्या जाळ््यात अडकतातच. तरुणांना व्यसनमुक्त करण्यासाठी धारावीत चक्क एक सिगारेटचा बाप्पा साकारण्यात आला आहे. हा बाप्पा गणेशभक्तांना ‘डोन्ट ब्लेम मी फॉर युवर डेथ’ असा संदेश जणू
देत आहे.
धारावी येथील सकिनाबाई चाळीतील ‘सिद्धिविनायक फेस्टिव्हल गणेशोत्सव मंडळ’ने सिगारेटच्या रिकाम्या पाकिटांपासून ४ फुटांची गणेशमूर्ती साकारली आहे. ही गणेशमूर्ती साकारायला १ वर्षाचा कालावधी लागला. तरुणाई मोठ्या प्रमाणात व्यसनांच्या आहारी जाते आहे. यामुळे त्यांना कर्करोग होण्याचा धोका बळावतो. तरुणाईला व्यसनमुक्त करण्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. यातूनच सिगारेटच्या पाकिटांचा बाप्पा साकारण्याची संकल्पना पुढे आल्याचे मंडळाचे अध्यक्ष आणि मूर्तिकार सेल्वराज नाडर यांनी सांगितले.
अनेक माध्यमांतून कर्करोग टाळण्यासाठी जनजागृती होताना दिसते. याचा काही प्रमाणात फायदाही होतो. पण तरीही अनेक जण व्यसनांच्या आहारी जाताना दिसत आहेत. गणेशोत्सवाच्या काळात अनेक गणेशभक्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटी देत असतात. या भक्तांचे फक्त मनोरंजन न करता त्यांच्या मानसिकता बदलण्यासाठी ‘डोन्ट ब्लेम मी फॉर युवर डेथ’ हा संदेश बाप्पा स्वत:च देत असल्याने नक्की फरक पडले, असे वाटले म्हणून ही संकल्पना
राबविली, असे नाडर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Bappa gives the message of addiction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.