शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकामांवर बडगा

By admin | Updated: August 10, 2015 02:24 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नवी मुंबईतील बेकायदा बांधकामांच्या विरोधातील कारवाईने गती घेतली आहे. सिडकोसह महापालिका आणि एमआयडीसी या तिन्ही यंत्रणा

नवी मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नवी मुंबईतील बेकायदा बांधकामांच्या विरोधातील कारवाईने गती घेतली आहे. सिडकोसह महापालिका आणि एमआयडीसी या तिन्ही यंत्रणा त्यादृष्टीने सक्रिय झाल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात बेकायदा बांधकामांवरील कारवाईच्या मुद्द्यावरून शहरातील वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.नवी मुंबईत महापालिका, सिडको व एमआयडीसी ही तीन प्राधिकरणे कार्यरत आहेत. त्यामुळे अतिक्रमणांवरील कारवाईच्या मुद्द्यावरून मतभेद झाले आहेत. याचाच फायदा घेत भूमाफियांनी बेकायदा बांधकामांचा धडाका लावला आहे. रातोरात नवीन इमारती उभारल्या जात आहेत. गरजेपोटीच्या नावाखाली टोलेजंग इमारती उभारल्या जात आहेत. एकूणच वाढत्या अतिक्रमणांमुळे शहर बकाल झाले आहे. या पार्श्वभूमीवर तिन्ही प्राधिकरणांनी आपापल्या जागेवरील अतिक्रमणे हटवावीत असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आतापर्यंत जबाबदारीची टोलवाटोलवी करणारी ही तिन्ही प्राधिकरणे अतिक्रमणांच्या विरोधात आक्रमक बनली आहेत. याचाच एक भाग म्हणून सिडकोने उरण, पनवेलसह नवी मुंबईतील २१९ अतिक्रमणांना जाहीर नोटिसा बजावल्या आहेत. दहा दिवसांची मुदत देण्यात आली असून त्यानंतर धडक कारवाई करण्यात येणार आहे. याअंतर्गत आतापर्यंत सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एमआयडीसीनेही आपल्या क्षेत्रातील बेकायदा बांधकामांच्या विरोधात मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत अनेक बांधकामांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. एकूणच बेकायदा बांधकामांच्या विरोधात हे तिन्ही शासकीय प्राधिकरणे सक्रिय झाल्याने भूमाफियांचे धाबे दणाणले आहे. (प्रतिनिधी)