शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

नाकर्तेपणामुळे पदोन्नतीचा ‘बॅकलाॅग’, महानगरपालिकेचेही झाले नुकसान

By नामदेव मोरे | Updated: September 1, 2023 11:29 IST

नवी मुंबई महानगरपालिकेला वैभव मिळवून देणाऱ्या येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशासकीय व राजकीय उदासीनतेमुळे फटका बसला आहे.

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या स्थापनेपासून अधिकारी, कर्मचाऱ्यांची वेळेवर पदोन्नती झाली नाही. यामुळे मनपामध्ये अधिकाऱ्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. कर्मचाऱ्यांचे  प्रचंड नुकसान झाले असून  प्रशासनाचा गाडा चालविण्यासाठी प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांवर अवलंबून रहावे लागत आहे. दोन वर्षात पदोन्नती धोरणाला गती दिली असली तरी त्यामुळे झालेले नुकसान भरून निघालेले नाही. 

नवी मुंबई महानगरपालिकेला वैभव मिळवून देणाऱ्या येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशासकीय व राजकीय उदासीनतेमुळे फटका बसला आहे. १९९२ मध्ये मनपाची स्थापना झाल्यानंतर पुढील २८ वर्षे वेळेवर कर्मचाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली नाही. काही झारीतील शुक्राचार्यांनी मनपाच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले नाहीत. अभियांत्रिकी विभागाने त्यांच्या कर्मचाऱ्यांना वेळेत पदोन्नती मिळेल यावर लक्ष दिले. यामुळे सद्यस्थितीमध्ये कनिष्ठ अभियंता ते शहर अभियंता बहुतांश सर्व महत्त्वाच्या पदांवर मनपाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांची नियुक्ती झालेली आहे. 

दोन वर्षात बॅकलॉग भरून काढण्याचा प्रयत्न     महानगरपालिकेच्या आयुक्तपदावर अभिजित बांगर व नंतर राजेश नार्वेकर  आल्यानंतर व अतिरिक्त आयुक्तपदावर  सुजाता ढोले यांची नियुक्ती झाल्यापासून अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदोन्नती व आश्वासित प्रगती योजनेचे लाभ देण्याच्या धोरणाला गती देण्यात आली आहे.  दोन वर्षात ४५ संवर्गातील ४१७ कर्मचारी, अधिकाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली आहे. दोन वर्षात जवळपास ६५० जणांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ दिला आहे.      याच गतीने पदोन्नती केल्या असत्या तर मनपाच्या सेवेतील किमान पाच उपायुक्त, एक अतिरिक्त आयुक्त कार्यरत असल्याचे चित्र पहावयास मिळाले असते.

कायमस्वरूपी नियुक्तीविरोधात तक्रारमहानगरपालिकेमध्ये नुकतेच  डॉ. राहुल गेठे यांची कायमस्वरूपी उपायुक्तपदावर समायोजन करण्यात आले आहे. या नियुक्तीला इंटक संलग्न महाराष्ट्र कर्मचारी युनियनने तीव्र आक्षेप घेतला आहे. महानगरपालिकेत अधिकारी नियुक्ती करताना प्रतिनियुक्तीच्या धोरणाची काटेकोर अंमलबजावणी होत नाही. इतर अधिकाऱ्यांना दोन किंवा तीन वर्षासाठी प्रतिनियुक्तीवर नेमणूक केली जात असताना आता कायमस्वरूपी उपायुक्तपदाचा अट्टाहास का? ही नियुक्ती रद्द करावी अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी दिला आहे. याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्य शासनाचे सचिव व मनपा आयुक्तांनाही पत्र दिले आहे.

अधिकाऱ्यांची गटबाजीअभियांत्रिकी विभागाप्रमाणे इतर विभागामधील कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची पदोन्नती वेळेत दिलेली नाही. अधिकाऱ्यांमधील गटबाजीही याला कारणीभूत असल्याची चर्चा आहे. यामुळे सद्यस्थितीमध्ये महानगरपालिकेला सहायक आयुक्त, उपायुक्त पदासाठी सक्षम व्यक्ती भेटत नाही. 

प्रतिनियुक्तीवर अधिकारी    महानगरपालिकेतील सर्व विभाग अधिकारी, बहुतांश उपायुक्त मनपाच्या सेवेतील होते. पण आता दहापैकी एकही उपायुक्त मनपाच्या सेवेतील नाही.     परिवहन, शिक्षण, नगररचना, मालमत्ताकर, लेखा विभाग, समाजविकास, परवाना, क्रीडा, घनकचरा, प्रशासन या सर्व प्रमुख पदांवर प्रतिनियुक्तीवरील अधिकारी कार्यरत आहेत.     दोन्ही अतिरिक्त आयुक्तही प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांकडे आहे. यापूर्वी आरोग्य विभागाचे प्रमुखपदही शासनाकडील अधिकाऱ्याकडे होते.     पण सद्यस्थितीमध्ये या पदावर मनपातील डॉक्टरांची वर्णी लागली आहे. 

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका