तळोजामध्ये पाच जणांविरोधात अ‍ॅट्रॉसिटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 23:06 IST2018-10-16T23:06:29+5:302018-10-16T23:06:37+5:30

पनवेल : पडघे बौद्धवाडा येथील अनुसूचित जातीच्या चौघांना लाकडी बांबू व लोखंडी सळईच्या साहाय्याने मारहाण करणाऱ्या पाच जणांविरोधात तळोजा ...

Atrocity against five people in Taloja | तळोजामध्ये पाच जणांविरोधात अ‍ॅट्रॉसिटी

तळोजामध्ये पाच जणांविरोधात अ‍ॅट्रॉसिटी

पनवेल : पडघे बौद्धवाडा येथील अनुसूचित जातीच्या चौघांना लाकडी बांबू व लोखंडी सळईच्या साहाय्याने मारहाण करणाऱ्या पाच जणांविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


रूपेश कांबळे हे कुटुंबीयांसह रविवारी घरासमोर गप्पा मारत बसले होते. याच दरम्यान गावातील सुभाष पुंडलिक दरे, किरण पुंडलिक दरे, ऋषिकेश कुमार दरे, संभाजी ऊर्फ भुºया पुंडलिक दरे, पुंडलिक दरे यांनी जातीवाचक शिवीगाळ करत दीनानाथ कांबळे व रूपेश कांबळे यांना बांबूने फटका मारला. तसेच सुलोचना कांबळे व दादू कांबळे यांना देखील मारहाण केली. दादू कांबळे यांना लोखंडी सळईच्या साहाय्याने डोक्यास दुखापत केली.
जुन्या रागाच्या वादातून ही मारहाण झाली असल्याचे बोलले जात आहे. तळोजा पोलिसांनी पाचही आरोपींविरोधात मारहाण व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Atrocity against five people in Taloja