शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचे होणार ‘अ‍ॅसेट मॅपिंग’

By admin | Updated: January 9, 2016 02:13 IST

जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या सर्व स्रोतांचे आणि पाणीपुरवठा योजनांच्या उपांगांचे अक्षांश-रेखांशानुसार स्थळ निश्चितीकरण (अ‍ॅसेट मॅपिंग) करण्यात येणार आहे

अलिबाग : जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या सर्व स्रोतांचे आणि पाणीपुरवठा योजनांच्या उपांगांचे अक्षांश-रेखांशानुसार स्थळ निश्चितीकरण (अ‍ॅसेट मॅपिंग) करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या संख्येने कोठे टंचाई आहे. अशुध्द पाण्याचा पुरवठा कोठे होतो याची माहिती संगणकाच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी दिली.नागपूर येथील एडीसीसी कंपनी आणि रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमनातून अ‍ॅसेट मॅपिंग करण्यात येणार आहे. जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने सहा हजार तीन पाण्याचे स्रोत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने नळ कनेक्शन, बोअरवेल आणि विहिरींचा समावेश होतो. पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची अणुजैविक व रासायनिक तपासणी उपविभागीय प्रयोगशाळेमार्फत करणे, अक्षांश-रेखांश काढणे, पिण्यायोग्य पाण्याला सांकेतांक देणे, पाण्याच्या स्रोतांच्या सद्य:स्थितीविषयी नकाशे तयार करणे, अशी विविध कामे जिल्ह्यातील ८२४ ग्रामपंचायतींमध्ये करण्यात येणार आहेत.अ‍ॅसेट मॅपिंग प्रणालीद्वारे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होणार असल्याचे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांनी सांगितले. हंगामी, बारामाही बंद असलेल्या जलस्रोतांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यामुळे पिण्यायोग्य पाण्याची माहिती नागरिकांना संगणकाच्या एका क्लिकवर मिळणार आहे. नागपूर येथील एमआरएसएसी यांच्यामार्फत मोबाइल अ‍ॅप्लिकेशन, सॉप्टवेअर, डाटा व्हॅलीडेशन, वेब पोर्टल तयार केले जाणार आहे. संबंधित संस्थेच्या कार्यप्रणालवीर सनियंत्रण करण्याचे काम भूजल सर्वेक्षण विभाग आणि जिल्हा पाणी गुणवत्ता सनियंत्रण कक्ष करणार असल्याचे साळुंखे यांनी स्पष्ट केले. यासाठी वरिष्ठ भूवैज्ञानिक, गटविकास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष, सचिव, जलसुरक्षक यांनी सहकार्य करण्याचे आवाहन दिलीप पांढरपट्टे यांनी केले. (प्रतिनिधी)