अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण; एमटीएनएलच्या नोडल अधिकाऱ्यांची साडेतीन तास उलटतपासणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 11:47 AM2022-02-21T11:47:34+5:302022-02-21T11:48:07+5:30

एमटीएनएलचे नोडल अधिकारी एस. धोतरे यांची सर तपासणी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी गेल्या महिन्यात घेतली होती; मात्र ते उलट तपासणीसाठी न्यायालयात हजर राहत नव्हते. त्यामुळे पनवेलच्या जिल्हा सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांनी त्यांच्या विरोधात वॉरंट जारी केले होते.

Ashwini Bidre murder case; Three and a half hours cross-examination of MTNL nodal officers | अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण; एमटीएनएलच्या नोडल अधिकाऱ्यांची साडेतीन तास उलटतपासणी 

अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण; एमटीएनएलच्या नोडल अधिकाऱ्यांची साडेतीन तास उलटतपासणी 

googlenewsNext

पनवेल : सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड खटल्यातील महत्त्वाचे साक्षीदार असलेल्या एमटीएनएलच्या नोडल अधिकाऱ्यांची आरोपीच्या वकिलांनी रविवारी साडेतीन तास उलटतपासणी घेतली. सर तपासणी झाल्यानंतर हे अधिकारी उलट तपासणीसाठी कोर्टात हजर राहत नव्हते. त्यामुळे त्यांच्याविरोधात न्यायालयाने वॉरंट काढले होते.

एमटीएनएलचे नोडल अधिकारी एस. धोतरे यांची सर तपासणी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी गेल्या महिन्यात घेतली होती; मात्र ते उलट तपासणीसाठी न्यायालयात हजर राहत नव्हते. त्यामुळे पनवेलच्या जिल्हा सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांनी त्यांच्या विरोधात वॉरंट जारी केले होते. त्यानंतर आज झालेल्या सुनावणीला धोतरे न्यायालयात हजर झाले. 

एकापाठोपाठ एक साक्ष विरोधात जात असल्याने मुख्य आरोपी अभय कुरुंदकर, राजेश पाटील, कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. खटल्याची पुढील सुनावणी ४ मार्च रोजी होणार आहे. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत, सहायक पोलीस आयुक्त संगीता अल्फान्सो उपस्थित होते.

- आरोपीच्या वकिलांनी त्यांची साडेतीन तास उलट तपासणी घेतली. त्यांनी दिलेले सीडीआर बनावट असल्याचा जोरदार दावा आरोपींच्या वकिलांनी केला; मात्र धोतरे यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहून हा दावा खोडून काढला. त्यामुळे हत्या होण्यापूर्वी अभय कुरुंदकर आणि अश्विनी बिद्रे हे एकत्र होते, यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले.

Web Title: Ashwini Bidre murder case; Three and a half hours cross-examination of MTNL nodal officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.