शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

एपीएमसी पुन्हा बनले गुन्हेगारांचे आश्रयस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 4:08 AM

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती पुन्हा गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनले आहे. २०१३ मध्ये संशयित अतिरेकी सापडल्यानंतरही प्रशासनाने सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत.

- नामदेव मोरेनवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती पुन्हा गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनले आहे. २०१३ मध्ये संशयित अतिरेकी सापडल्यानंतरही प्रशासनाने सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. येथे आश्रय घेतलेल्या दोघांनी महावितरणच्या गोडाऊनमधून केबल चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. सद्यस्थितीमध्ये दोन हजारपेक्षा जास्त परप्रांतीय कामगार विनापरवाना मार्केटमध्ये मुक्काम करत असून एपीएमसीला धर्मशाळेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.वाशी सेक्टर १९ मधील वीज मंडळाच्या गोडाऊनमध्ये ३१ मे रोजी दोघांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. नटबोल्ट व एक्साब्लेडच्या सहाय्याने बंद ट्रान्सफॉर्मरमधील १० किलो कॉपर केबल काढली. केबल चोरी करून नेत असताना पोलिसांनी ईसराईल सत्तार शेख या आरोपीला अटक केली. त्याची चौकशी केली असता तो मूळचा झारखंड राज्यातील साहेबगंज जिल्ह्यातील रहिवासी असून बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये रोजंदारीवर काम करत असल्याचे स्पष्ट झाले. पळून गेलेला आरोपी शिरअली खान हाही बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये काम करत आहे. आरोपी एपीएमसीमध्ये कोणाकडे काम करतात याविषयी माहिती घेण्यासाठी बाजार समिती प्रशासनाशी संपर्क साधला, परंतु या कामगारांची नोंद नसल्याचे स्पष्ट झाले. मार्केटमध्ये पाहणी केली असता दोन हजारपेक्षा जास्त परप्रांतीय कामगार मुक्काम करत असल्याचे निदर्शनास आले आहे. बाजार समितीच्या नियमाप्रमाणे गोडाऊन बंद झाल्यानंतर कोणीही मार्केटमध्ये थांबू नये. येथे काम करणाऱ्या प्रत्येकाची नोंद बाजार समितीकडे असणे आवश्यक आहे. परंतु परप्रांतीय मजुरांची नोंद कोणाकडेच उपलब्ध नाही. या कामगारांच्या आडून गुन्हेगारही याठिकाणी आश्रय घेऊ लागले आहेत.यापूर्वीही अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपी मार्केटमध्ये सापडले आहेत. दहा वर्षांमध्ये २०० पेक्षा जास्त बांगलादेशी नागरिकांना अटक झाली आहे. खून, दरोडे व चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींनाही अटक झाली आहे. भाजी व फळ मार्केटमध्ये गांजा विक्री केली जाते. आतापर्यंत या ठिकाणावरून हरिभाऊ विधाते, दत्ता विधाते, राजू घासवाला,पप्या, तुंडा यांना गांजा विक्रीच्या आरोपाखाली अटक झाली आहे. यापूर्वी अतिरेकी कारवाईशी संबंधित असलेल्यांनाही या ठिकाणावरून अटक केली आहे. दोन वर्षांपूर्वी नकली नोटा चलनात आणणारे रॅकेटही या परिसरामध्ये कार्यरत होते.अतिरेकीही सापडले होते१६ जानेवारी २०१३ मध्ये मुंबई पोलिसांनी मस्जिदबंदरमधील रिलॅक्स गेस्ट हाउसमधून हिजबुल मुजाहिद्दीनचा संशयित अतिरेकी फारूख नायकू व मोहम्मद तालुकदार यांना अटक केली होती. त्यांच्याकडून २७ हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा हस्तगत केल्या होत्या. यामधील नायकू याने एक वर्ष एपीएमसीच्या मसाला मार्केटमध्ये व्यापार केल्याचे स्पष्ट झाले होते. नायकू अनेक वेळा पाकिस्तानमध्ये जावून हिजबुलच्या कमांडरलाही भेटल्याचे स्पष्ट झाले होते. बाजार समिती प्रशासनाने ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत.पोलिसांच्यासूचनांकडे दुर्लक्षएपीएमसी पोलीस स्टेशनच्या अधिकाºयांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, बाजार समितीला यापूर्वीही अनेक वेळा नोटीस दिली आहे. येथे काम करणाºया व मुक्काम करणाºयांची नोंद ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. परंतु प्रशासन या सूचनांकडे दुर्लक्ष करत आहेत. मार्केटमध्ये कॅमेरेही बसविले जात नाहीत. पोलीस नियमित गस्त घालत असून कोणीही संशयित आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जात असल्याचे सांगितले.अमली पदार्थांचा व्यापारबाजार समितीच्या भाजी व फळ मार्केटमध्ये विनापरवाना वास्तव्य करणाºया अनेक कामगारांना अमली पदार्थांचे व्यसन आहे. त्यांना गांजा, गुटखासह इतर अमली पदार्थ पुरविणारी साखळीही या परिसरात कार्यरत आहे. यापूर्वी चार गांजा माफियांना येथून पोलिसांनी अटक केली आहे.प्रशासकीय मंडळाला धोरणात्मक निर्णय घेण्यावर न्यायालयाचे निर्बंध आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे. मार्केटमधील सुरक्षेच्या संदर्भात योग्य काळजी घेण्याच्या सूचना सचिवांना देण्यात येतील.- सतीश सोनी, मुख्य प्रशासक, बाजार समिती

टॅग्स :Crimeगुन्हा