Navi Mumbai Crime: अंमली पदार्थ तस्करांविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या मुंबई पोलिसांच्या पथकावर तस्करांनी प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना नवी मुंबईतील उलवे नोड येथे घडली. या हल्ल्यात गुन्हेगारांनी तलवारी, देशी कट्टे आणि हॉकी स्टिक्सचा वापर करत पोलिसांना आणि खबऱ्यांनी लक्ष्य केले. इतकेच नाही तर एका दुचाकीस्वाराने सहाय्यक पोलीस निरीक्षकांना चिरडण्याचाही प्रयत्न केला. ही घटना ३१ जानेवारी रोजी घडली.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली होती की, कुख्यात ड्रग्ज तस्कर इस्माईल शेख आणि शाहिद खान हे त्यांच्या १० ते १५ साथीदारांसह उलवे परिसरात येणार आहेत. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण मांढरे यांच्या नेतृत्वाखाली १० पोलिसांचे पथक सापळा रचण्यासाठी उलवे येथे पोहोचले.
रात्री ११:५० च्या सुमारास संशयित आरोपी दुचाकीवरून येताना दिसले. किरण मांढरे यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. मात्र, पोलिसांनी घेराव घालताच तस्करांनी टोळीने पोलिसांवर प्रतिहल्ला चढवला. आरोपींनी सर्वात आधी पोलीस खबऱ्यांवर हल्ला केला. एका खबऱ्याच्या डोक्यावर तलवारीने वार करण्यात आला, तर दुसऱ्याच्या छातीवर पिस्तूल लावून त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
एपीआय किरण मांढरे यांनी एका आरोपीला पकडून ठेवले असताना, दुसऱ्या एका तस्कराने त्यांना वाचवण्यासाठी मांढरे यांच्या अंगावर थेट दुचाकी घालून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. इतर पोलीस कर्मचारी आरोपींना पकडण्यासाठी पुढे सरसावले असता, त्यांच्यावरही तलवारीने सपासप वार करण्यात आले. सुदैवाने, या हल्ल्यात पोलीस कर्मचारी थोडक्यात बचावले असून कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.
मोबाईलमध्ये कैद झाला 'राडा'या संपूर्ण घटनेचा थरार परिसरातील एका व्यक्तीच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या व्हिडिओमध्ये तस्कर हातात शस्त्रे घेऊन सार्वजनिक रस्त्यावर पोलिसांना धमकावताना आणि पळवून लावताना स्पष्ट दिसत आहेत. या घटनेमुळे नवी मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गुन्हेगारांवर गुन्हे दाखल
या प्रकरणी पोलिसांनी इस्माईल शेख, शाहिद खान, अयाज खान, आसिफ खान, मेराज खान, निजाम, शोएब आणि मेहराज यांच्यासह इतर साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे:
पोलिसांची शोधमोहीम सुरू
घटनेनंतर आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले आहेत. मुंबई आणि नवी मुंबई पोलिसांनी या आरोपींना पकडण्यासाठी मोठी शोधमोहीम राबवली आहे. मात्र, भरवस्तीत आणि मुख्य रस्त्यावर तस्कर अशा प्रकारे शस्त्रांसह फिरत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
Web Summary : Drug smugglers attacked a Mumbai police team in Ulwe, injuring an officer. Armed with swords and guns, they targeted police and informants, even attempting to run over an officer with a bike. Police have launched a manhunt for the suspects.
Web Summary : उलवे में ड्रग तस्करों ने मुंबई पुलिस की टीम पर हमला किया, जिसमें एक अधिकारी घायल हो गया। तलवारों और बंदूकों से लैस, उन्होंने पुलिस और मुखबिरों को निशाना बनाया, यहां तक कि एक अधिकारी को बाइक से कुचलने की भी कोशिश की। पुलिस ने संदिग्धों के लिए तलाशी अभियान शुरू किया है।