इस्रायलच्या राजदूतांनी घेतली आयुक्त गणेश देशमुख यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 14:06 IST2022-02-01T14:05:52+5:302022-02-01T14:06:21+5:30

पनवेलमध्ये अनेक वर्षापासून इस्रायली लोकांची वसाहत असून त्यांची दफनभूमी तसेच इतर धार्मिकस्थळे आहेत.

Ambassador of Israel meets Commissioner Ganesh Deshmukh | इस्रायलच्या राजदूतांनी घेतली आयुक्त गणेश देशमुख यांची भेट

इस्रायलच्या राजदूतांनी घेतली आयुक्त गणेश देशमुख यांची भेट

पनवेल - पनवेल मधील इस्रायली दफनभूमीचा विकास करावा तसेच त्या अनुषंगाने असणाऱ्या विविध विषयांवरती चर्चा करण्यासाठी आज इस्रायलचे मुंबईतील वाणिज्यदूत कोबी शोशानी आणि इस्रायल वाणिज्य दूतातील विशेष प्रकल्प अधिकारी अनय जोगळेकर यांनी आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेतली.

पनवेलमध्ये अनेक वर्षापासून इस्रायली लोकांची वसाहत असून त्यांची दफनभूमी तसेच इतर धार्मिकस्थळे आहेत. त्यांचा विकास महापालिकेने करावा या हेतूने इस्रायलचे राजदूत कोबी शोशनी यांनी आयुक्त. गणेश देशमुख यांच्याशी चर्चा केली. तसेच पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रस्तावित विविध उपक्रमांची माहितीही यावेळी आयुक्तांनी शोशनी यांना दिली.

Web Title: Ambassador of Israel meets Commissioner Ganesh Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.