पनवेल महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळा शनिवारी बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 00:32 IST2023-04-14T00:32:38+5:302023-04-14T00:32:46+5:30
...या पुरस्कार वितरण सोहळ्याकरीता दिनांक १४ ते १६ या कालावधीत मोठ्या प्रमाणात जनसमुदाय येण्याची शक्यता असल्याने पालिका हद्दीतील शाळांना शनिवारी सुट्टी देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

पनवेल महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळा शनिवारी बंद
पनवेल : दत्तात्रेय नारायण उर्फ आप्पासाहेब धर्माधिकारी यांना सन 2022 या वर्षासाठीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. सदर पुरस्कार वितरण सोहळा दि १६ रोजी खारघर येथे आयोजीत करण्यात आलेला आहे. सदर पुरस्कार वितरण सोहळ्याकरीता दिनांक १४ ते १६ या कालावधीत मोठ्या प्रमाणात जनसमुदाय येण्याची शक्यता असल्याने पालिका हद्दीतील शाळांना शनिवारी सुट्टी देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
खारघर मधील या सोहळ्यासाठी 20 लाखांपेक्षा जास्त जनसमुदाय याठिकाणी येणार असल्याने महानगरपालिका हद्दीतील इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी ,वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने शासकीय ,खाजगी शाळा शनिवार दि १५ रोजी बंद ठेवण्याचे परिपत्रक पनवेल महानगरपालिकेने काढले आहे.पालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या मान्यतेने उपायुक्त विठ्ठल डाके यांनी हे परिपत्रक काढले आहे.