शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
2
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
3
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
4
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
5
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
6
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

ज्वेल ऑफ नवी मुंबईला समस्यांचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 12:51 AM

प्रशासनाचे दुर्लक्ष; दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त

नवी मुंबई : नवी मुंबई शहराच्या आकर्षणात भर घालणाऱ्या नेरु ळ येथील ज्वेल आॅफ नवी मुंबईला विविध समस्यांचा विळखा पडला आहे. तलावात सोडण्यात आलेल्या मलवाहिन्यांच्या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, तसेच उघड्यावरील केबलमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.उद्यानांचे शहर म्हणून ओळख असणाºया नवी मुंबई शहरात महापालिकेने नेरुळ येथे ज्वेल आॅफ नवी सारखे ठिकाण विकसित केले आहे, तलावाच्या सभोवताली सुमारे अडीच किलोमीटर अंतर असणारा जॉगिंग ट्रॅक, ओपन जिम, प्रसाधनगृह, पार्किंग, आधुनिक विद्युत व्यवस्था, अशा विविध सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शहरातील नागरिकांनी या ठिकाणाला पसंती दिली असून, शहरभरातून दररोज सुमारे शेकडो नागरिक या ठिकाणी येतात. भव्य जॉगिंग ट्रॅकमुळे तरुणाईबरोबर, वृद्धांचे व्यायाम करण्यासाठी येण्याचे प्रमाणदेखील मोठे आहे. ज्वेल आॅफ नवी मुंबई या ठिकाणच्या तलावात नेरुळ गावासमोरील बामणदेव मैदान आणि गणपत शेठ तांडेल मैदानाजवळून पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी पाइपलाइन सोडण्यात आलेली आहे; परंतु या पाइपलाइनमधून मोठ्या प्रमाणावर मलवाहिन्यांचे सांडपाणी तलावात सोडण्यात आले आहे. त्यामुळे या तलावाच्या किनाºयावर एक विशिष्ट तवंग पसरलेला आहे.या सांडपाण्यामुळे ज्वेल आॅफ नवी मुंबई या परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरलेली असते. त्यामुळे या ठिकाणी येणाºया नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्युत व्यवस्था करण्यासाठी टाकण्यात आलेल्या विद्युत केबल उघड्यावर असून, यामुळे अपघाताचा धोकाही निर्माण झाला आहे. पालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.