लाचप्रकरणी सिडकोच्या सहायक वसाहत अधिकाऱ्यावर कारवाई; नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 21:12 IST2026-01-28T21:12:01+5:302026-01-28T21:12:21+5:30

खारघर येथील व्यक्तीच्या तक्रारीवरून नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाने बुधवारी दुपारी ही कारवाई केली.

Action taken against CIDCO Assistant Colony Officer in bribery case; Navi Mumbai Anti-Corruption Department action | लाचप्रकरणी सिडकोच्या सहायक वसाहत अधिकाऱ्यावर कारवाई; नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाची कारवाई

लाचप्रकरणी सिडकोच्या सहायक वसाहत अधिकाऱ्यावर कारवाई; नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क,

नवी मुंबई : घराच्या ट्रान्सफर नोंदीसाठी ४ लाखाच्या लाचेची मागणी करून २ लाख स्वीकारणाऱ्या सिडको सहायक वसाहत अधिकाऱ्यावर एसीबीने कारवाई केली. बुधवारी दुपारी खासगी व्यक्तीमार्फत ही लाच घेण्यात आली. याप्रकरणी दोघांवर नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

खारघर येथील व्यक्तीच्या तक्रारीवरून नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाने बुधवारी दुपारी ही कारवाई केली. तक्रारदार यांनी जून २०२५ मध्ये घराच्या ट्रान्सफरसाठी ऑनलाईन अर्ज केला होता. त्यासाठी सिडकोचे विभागीय सहायक वसाहत अधिकारी शैलेश घरत (५७) यांनी ४ लाख रुपयांची मागणी केली होती. तर तडजोड अंती २ लाख रुपये घेण्याचे मान्य केले होते. तक्रारदार यांनी यासंदर्भात नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली होती. त्यावर चौकशीसाठी पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांनी निरीक्षक किरणकुमार वाघ, अरुंधती येळवे यांचे पथक केले होते. त्यांच्या पडताळणीत घरत यांनी खासगी व्यक्ती नागेंद्र तुलसीराम पांडे (५८) याच्यामार्फत लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून बुधवारी दुपारी नेरूळ स्थानकाबाहेर सापळा रचला होता.

त्यामध्ये पांडे याला घरत यांच्या वतीने लाच घेताना पकडण्यात आले. त्यानंतर घरत यांनाही नेरुळच्या सिडको कार्यालयातून ताब्यात घेतले. या दोघांवर लाचलुचपत प्रतिबंध कायद्यांतर्गत नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर घरच यांच्या घराची झडती घेण्याचे काम एसीबीच्या पथकमार्फत रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Web Title : नवी मुंबई में रिश्वतखोरी के आरोप में सिडको अधिकारी गिरफ्तार

Web Summary : सिडको के सहायक उपनिवेश अधिकारी को घर हस्तांतरण के लिए ₹4 लाख की रिश्वत मांगने और एक निजी व्यक्ति के माध्यम से ₹2 लाख स्वीकार करने के आरोप में गिरफ्तार किया गया। दोनों को गिरफ्तार कर लिया गया है, और नेरुल पुलिस स्टेशन में मामला दर्ज किया गया है।

Web Title : CIDCO Official Arrested for Bribery in Navi Mumbai

Web Summary : A CIDCO assistant colony officer was arrested for demanding a bribe of ₹4 lakh for a house transfer and accepting ₹2 lakh through a private individual. Both have been arrested, and a case has been registered at Nerul Police Station.