कामात दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई
By Admin | Updated: October 6, 2016 03:56 IST2016-10-06T03:56:15+5:302016-10-06T03:56:15+5:30
पनवेल शहर महानगरपालिका क्षेत्राला स्वच्छ, सुंदर आणि स्मार्ट बनविण्यासाठी प्रयत्न केले जातील, तसेच कामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आश्रय देणार नसल्याचे पनवेल शहर

कामात दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई
पनवेल : पनवेल शहर महानगरपालिका क्षेत्राला स्वच्छ, सुंदर आणि स्मार्ट बनविण्यासाठी प्रयत्न केले जातील, तसेच कामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आश्रय देणार नसल्याचे पनवेल शहर महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांनी पनवेल शहर महानगरपालिकेत बुधवारी आयोजित के लेल्यापत्रकार परिषदेत सांगितले.
कामात दिरंगाई केल्याप्रकरणी आरोग्य विभागातील सुरेश भालेराव या कर्मचाऱ्याला निलंबित केले आहे. पनवेलमधील प्रभाग क्र मांक ७ मधील कोळीवाडा परिसरात अंगणवाडीसमोर मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला असल्यामुळे स्वच्छता विभागात मुकादम म्हणून कार्यरत असताना आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार न पाडल्यामुळे हे निलंबन करण्यात आले असल्याचे पालिका आयुक्त शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. शनिवारी १ आॅक्टोबर रोजी आयुक्तांनी उशिरा आयुक्तपदाचा पदभार सांभाळल्यानंतर सोमवारपासून उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामात शिस्त येण्यासाठी कारवाईचा बडगा उगारला आहे. सोमवारी ५९ , मंगळवारी ५९ तर बुधवारी ४९ स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांवर कारवाई करीत या कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात केले.
विशेष म्हणजे वर्ग ३ श्रेणीतील ५१ कर्मचाऱ्यांचा देखील एका दिवसाचा पगार कपात करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला. यापूर्वी तत्कालीन नगरपरिषदेत एवढी मोठी कारवाई झाली नसल्यामुळे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसह अधिकारी वर्गाने देखील धसका घेतला आहे. पनवेल शहर महानगरपालिकेतील नागरिकांना चांगल्या सोयी - सुविधा देण्यासाठी आम्ही कार्यतत्पर राहणार असून नागरिकांनी शहरातील समस्यांसंदर्भात थेट आयुक्तांशी संपर्कसाधण्याचे आवाहन यावेळी आयुक्त सुधाकर शिंदे यांनी केले.
पत्रकार परिषदेसाठी महापालिकेचे अधिकारी भगवान गाडे, कनिष्ठ अभियंता संजय कटेकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)