शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

सिडकोची ग्रामपंचायत काळातील बांधकामांवरही कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2019 11:56 PM

सिडकोने तुर्भे सेक्टर २४मध्ये ग्रामपंचायत काळातील पुरावे असलेल्या बांधकामांवर कारवाई केली आहे. १९७८ पासून रहिवासी असल्याचे दाखले व १९९५च्या सर्वेक्षणामध्ये पात्र असलेल्या झोपड्याही हटविल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

नवी मुंबई : सिडकोने तुर्भे सेक्टर २४मध्ये ग्रामपंचायत काळातील पुरावे असलेल्या बांधकामांवर कारवाई केली आहे. १९७८ पासून रहिवासी असल्याचे दाखले व १९९५च्या सर्वेक्षणामध्ये पात्र असलेल्या झोपड्याही हटविल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या अन्यायाविरोधात आंदोलन करण्याचा व वेळ पडल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा बेघर झालेल्या रहिवाशांनी दिला आहे.शासनाने १९९५ पूर्वीच्या झोपड्या अधिकृत केल्या आहेत. सन २००० पर्यंतच्या झोपड्यांनाही अभय देण्यात आले आहे. अतिक्रमणविरोधी पथकांनी कारवाई करताना जुन्या बांधकामांवर कारवाई करू नये, असे अपेक्षित असते. परंतु सिडकोने तुर्भेमधील बांधकामांवर कारवाई करताना नागरिकांच्या पुराव्यांकडे दुर्लक्ष करून घरांवर जेसीबी फिरविला. १९७८ पासून येथे राहणाऱ्या प्रभावती लक्ष्मण खांदारे या ८० वर्षांच्या महिलेच्या डोक्यावरील छत हिरावून घेतले आहे. या अन्यायाविरोधात माहिती देताना त्यांनी सांगितले की, आम्ही ग्रामपंचायत असल्यापासून येथे वास्तव्य करीत आहोत. ग्रामपंचायतीच्या करपावत्याही आमच्याकडे आहेत. महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर १९९५ पासून मालमत्ता कर भरत आहोत. झोपडपट्टी सर्वेक्षणामध्येही आम्ही पात्र ठरलो आहोत. सर्व कागदोपत्री पुरावे असताना अतिक्रमणविरोधी पथकाने मनमानी करून आमची घरे उद्ध्वस्त केली असून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मनीषा शेट्टी यांचे वडील रामेश्वर उदमले यांचेही १९८० पासून येथे घर आहे. ग्रामपंचायत काळातील कर भरल्याच्या पावत्यांसह १९९५च्या झोपडपट्टी सर्वेक्षणाची पावतीही त्यांच्याजवळ आहे. घरातकोणी नसताना त्यांचे घर पाडण्यात आले आहे. वडिलांना बसलेल्या धक्क्यामुळे मनीषा या माहेरून येथे आल्या असून, न्याय मिळावा यासाठी धडपडत आहेत.तुर्भेमध्ये राहणाºया पिंकी राठोड यांच्या वडिलांचे व चुलत्यांचे घर या ठिकाणी आहे. त्यांच्याकडेही वास्तव्याचे सर्व पुरावे आहेत. अतिक्रमणविरोधी पथकाला आमच्याकडे पुरावे आहेत, त्यामुळे कारवाई थांबविण्यात यावी, अशी विनंती केली होती. परंतु कारवाईसाठी आलेल्या अधिकाºयांनी आमचे म्हणणे ऐकूनच घेतले नसल्याचे मत व्यक्त केले.सिडकोने आमच्यावर अन्याय केला आहे. आम्हाला आमचे घर पुन्हा मिळावे व कारवाई केलेल्या अधिकारी व कर्मचाºयांवरच कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.कारवाईमुळे ८० वर्षांच्या आईला धक्का बसला आहे. १९७८ पासून आम्ही येथे राहत आहोत. सिडकोने आमच्यावर अन्याय केला असून याविरोधात आम्ही न्याय मिळेपर्यंत आंदोलन करू.- कल्पना खांदारे,पीडित, रहिवासीआमच्याकडे घराचे सर्व पुरावे आहेत. आमची घरे १९८५ पासून येथेच आहेत. १९९५ च्या सर्र्वेक्षणाचे पुरावे असताना सिडकोने आम्हाला बेघर केले आहे.- पिंकी राठोड,रहिवासीआई कामावर गेलेली असताना सिडकोने कारवाई केली. घरातील सर्वांना धक्का बसला आहे. हक्काचे घर उद्ध्वस्त केले असून, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे.- मनीषा शेट्टी,रहिवासी

टॅग्स :cidcoसिडको