शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'मर्दासारखे वागा, कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवू नका'; मंदा म्हात्रे यांचा नाव न घेता गणेश नाईकांवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 05:46 IST

'तुम्हाला २५ वर्षात काही जमलं नाही. त्यामुळं असा विरोध करीत आहात का?, असा सवाल आमदार मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक यांना केला. 

नवी मुंबई : बेलापूर येथील मैदानावरील प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी रुग्णालय व मेडिकल कॉलेजसाठीदुसरी जागा निवडावी, असा प्रस्ताव गावातील १४ नगरसेवक भरत भोईर यांच्या माध्यमातून महासभेत आला होता. त्यावर बेलापूरच्या आ. मंदा म्हात्रे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन टीका केली. यावेळी त्यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना लक्ष्य करून त्यांचे नाव न घेता "मर्द असाल तर मर्दासारखे वागा, कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवू नका," असा थेट इशारा दिला.

म्हात्रे म्हणाल्या की, रुग्णालयासाठी आवश्यक परवानग्या मिळवून भूखंडही निश्चित केला. मात्र, हे काम महिलेच्या पुढाकारातून होत असल्याने अडथळे निर्माण केले जात आहे. विरोध झाला नसता तर आज अर्धे रुग्णालय उभे राहिले असते. तसेच आठ एकरच्या या भूखंडाचा पूर्वी व्यावसायिक वापर सुरू होता आणि मैदान भाड्याने दिले जात होते. २५ वर्षे काहीच करू न शकलेले लोक आज विकासाला विरोध करीत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

अनधिकृत बांधकामे लक्षवेधी घेऊन बाहेर काढेन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यासंदर्भात भेट घेतली आहे. एक महिला रुग्णालयासाठी प्रयत्न करते आणि हे लोक विरोध करीत असल्याची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली असून, त्यांनी आयुक्तांना आदेशित केल्याचे त्यांनी सांगितले. २५ वर्षात तुम्हाला हे जमले नाही, त्याची पोटदुखी आहे का? असेल तर या, मी तुम्हाला अॅडमिट करते. आता पैसे मिळायचे बंद झाल्याने त्यांची प्रकृती बिघडली आहे. मी आजवर दोन वेळा धक्का दिला आहे आणि परत देईन, माझ्या नादाला लागू नका, असे सांगून कोणाची किती अनधिकृत बांधकामे आहेत, हे लक्षवेधी घेऊन बाहेर काढेन, असा इशाराही त्यांनी दिला.

कंत्राटात हवी टक्केवारी

तुम्हाला २५ वर्षात काही जमलं नाही. त्यामुळं असा विरोध करीत आहात का, असा सवाल करून तुम्ही पालिकेचे हॉस्पिटल बांधून ते फोर्टिजला विकले, असा आरोपदेखील त्यांनी केला. 

वाशी प्लाझा कसा उभा राहिला? त्यामध्ये दुकाने, स्पा कोणाची आहेत? गटारे, नाल्यावर इमारती कशा उभ्या राहिल्या? असे प्रश्न करून नगरसेवकांना भाजपने तिकीट पक्षाच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी दिलेली नसल्याचे यावेळी त्या म्हणाल्या. त्यांना या रुग्णालयाच्या कंत्राटांमधूनही टक्केवारीची अपेक्षा असल्याचा आरोप त्यांनी केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Manda Mhatre attacks Ganesh Naik, says 'Act like a man'

Web Summary : Manda Mhatre criticized opposition to a Belapur hospital project, accusing Ganesh Naik of obstructing progress led by a woman. She warned of exposing unauthorized constructions and alleged demands for contract percentages, referencing past deals.
टॅग्स :Manda Mhatreमंदा म्हात्रेGanesh Naikगणेश नाईकBJPभाजपाNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका