एसीपी राजकुमार चाफेकर अखेर मध्य प्रदेशमध्ये सापडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2018 12:34 IST2018-04-08T12:34:08+5:302018-04-08T12:34:08+5:30
रहस्यमयरीत्या बेपत्ता झालेले आर्थिक गुन्हे शाखेचे एसीपी राजकुमार चाफेकर यांचा ठावठिकाणा अखेर लागला असून, एसीपी चाफेकर हे मध्य प्रदेशमधील जबलपूर येथे असल्याचे समोर आले आहे.

एसीपी राजकुमार चाफेकर अखेर मध्य प्रदेशमध्ये सापडले
नवी मुंबई - रहस्यमयरीत्या बेपत्ता झालेले आर्थिक गुन्हे शाखेचे एसीपी राजकुमार चाफेकर यांचा ठावठिकाणा अखेर लागला असून, एसीपी चाफेकर हे मध्य प्रदेशमधील जबलपूर येथे असल्याचे समोर आले आहे. चाफेकर हे गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होते. त्यामुळे कुटुंबीयांनी ते बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली होती.
दरम्यान, एसीपी राजकुमार चाफेकर हे मध्य प्रदेशमधील जबलपूरच्या रेल्वे स्थानकावर सापडले. त्यांना आणण्यासाठी नवी मुंबई पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. मात्र ते नेमके जबलपूर ला का व कसे गेले आणि त्यांच्या तिथे जाण्याचे नेमके कारण काय याविषयीचे गूढ निर्माण झाले आहे.