चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 04:40 IST2018-10-06T04:40:41+5:302018-10-06T04:40:56+5:30

कोपरखैरणेतील घटना : गुन्हे शाखेची कारवाई; १५ लाखांचा ऐवज जप्त

 The accused arrested in the theft | चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक

चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक

नवी मुंबई : कोपरखैरणेतील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. बंद घरात चोरी करून सुमारे २० लाखांचा ऐवज चोरून तो पळाला होता. चार महिन्यांनी तो ऐरोलीत नातेवाइकाच्या भेटीसाठी आला असता, पोलिसांनी त्याला अटक केली.

हापुराम अम्राराम गुजर (२८), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो मूळचा राजस्थानचा राहणारा असून, कोपरखैरणेत ओळखीच्या व्यक्तीकडे राहायला होता. चार महिन्यांपूर्वी घरातील व्यक्ती बाहेर गेल्या असता, त्याने घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा सुमारे २० लाखांचा ऐवज चोरून नेला होता. मात्र, गुन्हा केल्यानंतर तो बंगळुरूला कुठे पळाला, याची माहिती पोलिसांना कळू शकलेली नव्हती. अखेर तो ऐरोलीतील एका नातेवाइकाच्या भेटीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष तीनचे पोलीस नाईक सुधीर चव्हाण यांना मिळाली होती. यानुसार वरिष्ठ निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित ठिकाणी पथकाने सापळा रचला होता. चौकशीत त्याने कोपरखैरणेतील गुन्ह्याची कबुली दिल्याचे वरिष्ठ निरीक्षक कादबाने यांनी सांगितले. या गुन्ह्यातील चोरीला गेलेल्या ६७० ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांपैकी १५ लाख ३० हजार रुपये किमतीचे ५१० ग्रॅम दागिने जप्त करण्यात आले आहेत.
 

Web Title:  The accused arrested in the theft